वेदिका शिंदेचा मृत्यू , 16 कोटीं चे लस इंजेक्शन नंतरही झुंज अपयशी

वेदिका शिंदेचा  मृत्यू  , 16 कोटीं चे लस इंजेक्शन नंतरही झुंज अपयशी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. यासाठी आई-वडिलांनी लोकासहभागासाठी आवाहन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून … Read more

Maharashtra Unlock Update: राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार ?

Maharashtra Unlock Update: राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार ?

मुंबई : राज्यात नव्या कोरोनाबाधित (Maharashtra Corona Virus) रुग्णांची संख्या घटल्याने लॉकडाऊनचे (Maharashtra Lockdown) निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल (Maharashtra Unlock) केला जाऊ शकतो. राज्य सरकार यासंदर्भात आज घोषणा करण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या आठवड्याच्या सुरुवातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. त्यासोबतच दोन्ही लसी … Read more

Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

Covid-19 third wave| नांदेड जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोका दृष्टीक्षेपात ठेऊन परिपूर्ण नियोजन -जिल्हाधिकारी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या होणार चाचण्या जिल्ह्यात दररोज किमान 5 हजार 700 चाचण्याचे उद्दिष्ट -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नांदेड (जिमाका) दि. 26 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दृष्टीपथात ठेवून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका अजून तसूभरही कमी झालेला नाही. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय … Read more

साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासोबत नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासोबत नागरिकांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई, दि. २५ : राज्यातील पूरग्रस्त भागातील जनतेला आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला. पूरग्रस्त भागात जखमी झालेल्या नागरिकांवर तत्काळ उपचार करतानाच त्यांना मानसिकदृष्ट्या सावरण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेला केले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधून आवश्यक … Read more

झिकाःआजार, लक्षणे व उपचार | What is zika virus, symptoms and treatment

झिकाःआजार, लक्षणे व उपचार | What is zika virus, symptoms and treatment

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक झाले आहे. What is zika virus, symptoms and treatment

त्या अनुषंगाने या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना जाणून घेऊ या-
झिका आजाराची चिन्हे व लक्षणेः What is zika virus, symptoms and treatment
झिका आजाराचा अधिशयन कालावधी निश्चितपणे किती आहे याबद्दल सुस्पष्टता नाही तथापि, तो काही दिवसाचा असावा असे दिसते. बहुसंख्य रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळत नसली तरी झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. त्यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात आणि ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. तसेच या आजारात मृत्युचे प्रमाणही नगण्य आहे. What is zika virus, symptoms and treatment

झिका आजारातील गुंतागुंतः
झिका आजाराच्या २०१३ च्या फ्रान्स देशातील उद्रेकामध्ये तसेच २०१५ च्या ब्राझिलमधील उद्रेकामध्ये खालील महत्त्वपूर्ण गुंतागूंत नमुद करण्यात आल्या आहेत.
मायक्रोसिफॅली (डोक्याचा घेर कमी असणे) – गरोदरपणामध्ये झिका विषाणुची बाधा झाल्यास होणाऱ्या अर्भकाच्या डोक्याचा घेर कमी होतो असे दिसून आले आहे.
गिया बारी सिंड्रोम- या दोन्ही गुंतागुंतीचा झिका विषाणूची असलेला आंतरसंबंध नेमकेपणाने सुस्पष्ट होण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

झिका आजाराचे निदानः
राष्ट्रीय रोग निदान संस्था, नवी दिल्ली तसेच राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था, पुणे येथे या आजाराच्या निदानाची सुविधा मोफत उपलब्ध आहे. याकरिता डेंग्यु आजाराप्रमाणेच झिका संशयित रुग्णाचे रक्त / रक्तद्रव दोन ते आठ तापमानात शीतलता अबाधित ठेऊन तपासणीसाठी पाठवावे. प्रयोगशाळा नमुन्यासोबत रुग्णाची संक्षिप्त माहीती देणारा फॉर्म भरून पाठवावा. हा फॉर्म राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
उपचारः symptoms and treatment
झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे.
रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
तापाकरिता पॅरासिटामॉल औषध वापरावे.
अॅस्पिरीन अथवा एन. एस. ए. आय. डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.
ताप रुग्ण सर्वेक्षणः
झिका आजारामुळे उद्भवलेल्या या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्याने/मनपाने आपल्या कार्यक्षेत्रातील ताप रुग्ण सर्वेक्षण अधिक सुदृढपणे करणे आवश्यक आहे. ताप रुग्ण सर्वेक्षण करताना गरोदर मातांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. डेंगी, चिकुनगुन्या या आजाराच्या सर्वेक्षणासाठी जी पद्धत वापरली जाते त्याप्रमाणे या आजारामध्ये सर्वेक्षण करण्यात यावे.

एकात्मिक किटक नियंत्रणः
झिका आजार हा एडीस डासामुळे पसरतो. याच डासामुळे डेंग्यु आणि चिकुनगुन्या या आजारांचाही प्रसार होतो. हे डास महाराष्ट्रासह देशभरात विपूल प्रमाणात आढळत असल्यामुळे झिका आजाराचा प्रसार आपल्याकडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता एडीस डास प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.

याकरीता एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत येणाऱ्या खाली नमुद केलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात.

(१) किटकशास्त्रीय निर्देशांक नियमितपणे तपासावेत. या डासांचा गृहनिर्देशांक (हाऊस इंडेक्स) १०% पेक्षा जास्त किंवा ब्रॅटयू इंडेक्स ५०% पेक्षा जास्त असल्यास भविष्यात या ठिकाणी उद्रेकाची शक्यता गृहीत धरुन संबंधित आरोग्य संस्थेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरीत सुरु करण्यात यावे.

२) ताप उद्रेक झालेल्या गावात व आजूबाजूच्या ५ कि.मी. परिसरातील सर्व गावातील साठविलेल्या पाण्याचे साठे दर आठवडयातून रिकामे करण्याची कार्यवाही करावी. डासोत्पत्ती स्थाने नष्ट करावीत. पाणी साठवून ठेवणाऱ्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.

३) साठविलेल्या पाण्याचे जे साठे आठवड्याला रिकामे करता येत नाहीत; अशा पाण्याच्या साठ्यात टेमिफॉस (ॲबेट) या अळीनाशकाचा वापर योग्य प्रमाणात करावा. घरातील पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात टेमिफॉसचा वापर करू नये.

४) किटकशास्त्रीय यंत्रणेमार्फत ताप उद्रेकग्रस्त गाव व परिसरातील ५ कि.मी. भागात किटकशास्त्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही करावी.

५) नियमित सर्वेक्षणात दर हजारी लोकसंख्येत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेल्या गावात जलद ताप सर्वेक्षण करून रुग्णांना योग्य औषधोपचार द्यावा, तसेच संशयित लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी किमान ५ % किंवा कमीत कमी पाच रुग्णांचे रक्तजल नमूने विषाणू परिक्षणासाठी राष्ट्रीय विषाणू संस्था, / सेंटीनल सेंटर यांचेकडे पाठवावेत.

६) धूर फवारणीसाठी आवश्यक असलेले किटक रक्षक ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थांना आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून द्यावेत.

७) ताप उद्रेक झालेल्या गावात किटकनाशक धूरफवारणीच्या दोन फेऱ्या आठ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. पहिली फेरी त्वरीत घ्यावी.

८) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालये या ठिकाणी ताप, डेंगीताप, चिकुनगुनिया इत्यादी रुग्णांचे औषधोपचारासाठी आवश्यक असलेले सर्व औषधी योग्य प्रमाणात मोफत उपलब्ध असतात.

९) खाजगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल झालेल्या सर्व संशयित रुग्णांची व त्यांना दिलेल्या उपचाराबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविण्यासंदर्भात सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी.

(१०) तालुका निहाय सर्व सरपंच ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांची संयुक्त सभा तालुकास्तरावर आयोजित करून या सभेत एडीस डास नियंत्रणाबाबत आवश्यक सूचना जाणून घेऊन उपाययोजना कराव्या.

(११) साठून राहिलेल्या पाण्यात इतर डासांची निर्मिती होत असल्याने अशा डास उत्पत्ती स्थानांतील पाणी वाहते केल्यास इतर डासांची पैदास रोखण्यास मदत होईल त्यासाठी खड्डे बुजविणे, खड्ड्यातील पाणी काढून टाकणे, इत्यादी कामे महानगरपालिका / नगरपालिका तसेच ग्रामपंचायतीने करावीत.

(१२) जनतेमध्ये सर्व आवश्यक त्या प्रसिद्धी माध्यमांमार्फत या आजारांविषयी आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करावी.

अशा सुचना संचालक, आरोग्य सेवा पुणे यांनी दिल्या आहेत.

Read more

झाडे लावा पण देशी की विदेशी चर्चा रंगलीय-शंका कुशंका वास्तविकता काय आहे.

झाडे लावा पण देशी की विदेशी चर्चा रंगलीय-शंका कुशंका वास्तविकता काय आहे.

environment clarification over indigenous and foreign trees planting सध्या विदेशी झाडे लावावी की देशी प्रजातीची झाडे यावर वाद सुरु असतात. काही देशी झाडांची बाजू घेतात तर काही विदेशी प्रजातीच्या झाडांची. मात्र या वादाकडे पर्यावरणपूरक की पर्यावरण घातक यादृष्टीकोनातून पाहायला हवे. पर्यावरण दिनानिमित्त प्रा. डॉ. निनाद शहा (सोलापूर) यांचा विशेष लेख विविध देशात तेथील पोषक हवामान, … Read more

महाराष्ट्रात ३ कोटी लोक लसवंत |The first dose of vaccine was given to more than 3 crore citizens

महाराष्ट्रात ३ कोटी लोक लसवंत |The first dose of vaccine was given to more than 3 crore citizens

मुंबई, दि.१६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत रात्री आठपर्यंत ६ लाख १३ हजार लसीकरण झाले. त्यामुळे आता राज्यात पहिला डोस मिळालेल्यांची संख्या ३ कोटी ४७ हजार एवढी झाली आहे. तर ८८ लाख ३७ हजार नागरिकांना दोन्ही डोस देण्यात आल्याने सर्वाधिक नागरिकांचे संपूर्ण लसीकरण करणारे राज्य म्हणून देशात महाराष्ट्र अग्रभागी आहे. लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर असून दोन्ही … Read more

Mukhymantri MahaArogya Skills Development Training |मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम | हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रम

Mukhymantri MahaArogya Skills Development Training |मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम | हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रम

Online Team | MahaArogya Skills Development Program कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे … Read more

Covid Vaccination | कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी- Bharat Biotech | Covaxin is 77.8% effective

Covid Vaccination | कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी- Bharat Biotech | Covaxin is 77.8% effective

Online Team : कोव्हॅक्सिन (Covaxin) लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे. भारत बायोटेकने तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीच्या आधारे हा दावा केला आहे. हा डेटा अद्याप पडताळण्यात आलेला नाही. कोव्हॅक्सिन (Covaxin) लस घेतली असता वेगाने पसरणा-या डेल्टा व्हेरियंटविरोधात ६५.२ टक्के सुरक्षा मिळते असा भारत बायोटेकचा दावा आहे. याशिवाय कोरोनाच्या इतर लक्षणांविरोधात ९३.४ … Read more

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणातर्गंत विविध कोर्स करण्याची संधी |CM Maha-Arogya Skills Development Training

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणातर्गंत विविध कोर्स करण्याची संधी |CM Maha-Arogya Skills Development Training

नांदेड | आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करुन रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातुन वैद्यकीय क्षेत्रात साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा या क्षेत्रात उपलब्ध रोजगार संधीच्या दृष्टिकोनातुन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 2021 करिता मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice