पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. यासाठी आई-वडिलांनी लोकासहभागासाठी आवाहन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस आयात करण्यात यश आलं होतं. 15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. आता ती ठणठणीत बरी होईल अशीच अख्ख्या देशाला अपेक्षा होती. पण रविवारी मात्र ही दुःखद बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये.
फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत नसल्याचं दिसून आलं होतं. म्हणून तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचं समजलं. कारण ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.
पण वेदिकाच्या आई-वडिलांनी हार मानली नाही. 16 कोटी रुपयांसाठी त्यांनी समाजाकडे मदतीची हाक दिली. बघता-बघता पैसे जमा होऊ लागले. आई-वडिलांनी महाराष्ट्र पिंजून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर जून महिन्यात 16 कोटी उभे राहिले. अमेरिकेहून झोलगेन्स्मा लस ही आली. 15 जूनला ती लस वेदीकाला देण्यात आली. नंतर तिचं शरीर लसीला साथ देऊ लागलं, सकारात्मक हालचाली दिसू लागल्या. सगळं सुरळीत होताना दिसू लागलं, पण गेल्या काही दिवसांत तिची तब्येत पुन्हा खालाऊ लागली.
31 जुलैला त्यात पुन्हा सुधारणा झाली, रविवारी दुपारपर्यंत देखील ती चांगला प्रतिसाद देत होती. फेसबुकवर तिच्या नावाने असलेल्या पेजवर तिचे व्हिडीओ पोस्ट करत तशी माहितीही देण्यात आली. तिचे वडील सौरभ शिंदेंनी फेसबुकवर स्टेटस ठेवत हितचिंतकांना कळवलं. पण त्यानंतर अचानक वेदिकाची तब्येत खालावली अन तिने जगाचा निरोप घेतला. गेली सहा महिने तिच्या जगण्याचा संघर्ष सुरू होता, पण रविवारी मात्र तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. ही दुःखद बातमी येताच देशात हळहळ व्यक्त केली जातीये.
हे ही वाचा ——
- India Post Office Bharti | भारतीय डाक विभागात Garmin Dak Sevak पदांच्या एकूण २१४१३ जागाभारतीय डाक विभाग यांच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २१,४१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन…
- लाडकी बहीण योजना विषयी मंत्री आदिती तटकरे यांनी केली महत्वपूर्ण घोषणामुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील…
- शिवद्रोही राहुल सोलापूरकरच्या “आग्र्याहून सुटका” ऐतिहासिक घटनेबद्दल वक्तव्यचा दूरगामीकाय परिणाम होतो. कोणत्या गोष्टीला हानी पोहोचवते.ज्या इतिहासापासून या देशातील महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा मिळते जीवन जगण्याला, राष्ट्राला, सैन्याला ऊर्जा…
- जालना शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनसह पालक मेळावा, बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजनAnnual gathering along with parents’ meet, child marriage awareness program organized at Kasturba…
- अंजली बदनामिया यांनी माझ्यावर केलेले कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप खोटे धनंजय मुंडे यांचा पलटवारमार्च २०२४ दरम्यान कृषी विभागाने खरेदी केलेल्या नॅनो खते, इलेक्ट्रिक फवारणी पंप, कापूस…