Bank Charge|बँक खातेदाराकडुन मिनिमम बॅलन्स शिवाय कोणकोणते चार्ज आकारतात.

Bank Charge|बँक खातेदाराकडुन मिनिमम बॅलन्स शिवाय कोणकोणते चार्ज आकारतात.

Bank different Charges apart from Minimum Balance from account holders?

मुंबई: एखाद्या बँकेत खाते उघडल्यानंतर तुम्हाला अनेक आर्थिक सुविधा मिळतात. सरकारी बँकाच्या तुलनेत मिळणाऱ्या झटपट सेवा आणि सुविधांमुळे अनेकजण भारावून जातात. मात्र, यासाठी त्यांच्याकडून बँक पैसे आकारत असल्याची बाब अनेकांना ठाऊकही नसते. ठराविक काळानंतर बँक हे पैसे तुमच्या खात्यातून कापून घेत असते. बँकेत तुम्हाला रोख रक्कमेचा व्यवहार करायचा असल्यास सुरुवातीची चार ते पाच ट्रान्झेक्शन्स मोफत असतात. मात्र, त्यानंतरही बँकेत किंवा एटीएममध्ये जाऊन पैसे काढल्यास तुमच्याकडून शुल्क आकारले जाते. हे शुल्क 20 रु ते 100 रुपयांपर्यंत Charge असू शकते.

तुम्ही बँकेचे एटीएम कार्ड वापरता त्यासाठी अनेकप्रकारचे शुल्क आकारले जाते. तुम्ही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केलेत तर शुल्क भरावे लागते. प्रत्येक बँकेनुसार हे शुल्क वेगवेगळे साधारण 5 रु ते 20 रु पर्यंत असते. याशिवाय, एटीएम कार्ड मेंटेनन्ससाठीही वार्षिक शुल्क 100 रु आकारले जाते. एटीएम withdrawal ट्रान्झेक्शन्स transaction मेसेज तसेच बॅंक मार्फत येणारे इतर सुचना मेसेज (massage) साठी काही बॅंक मासीक शुल्क साधारण 15 रु पर्यंत चार्ज आकरतात.

तसेच तुम्ही बँक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास तुमच्याकडून दंड आकारला जातो. मेट्रो, सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील शाखांमध्ये मिनिमम बॅलन्सची मर्यादा 500 रु ते 2000 रु पर्यंत वेगवेगळी आहे. खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर साधारण 100 रुपये आणि जीएसटी इतक्या रक्कमेचा दंड आकारला जातो.

तुम्ही एटीएममध्ये गेलात आणि त्याठिकाणी एखादे ट्रान्झेक्शन transaction फेल झाल्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागतो. यासाठी साधारण 25 रुपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे एटीएममधून पैसे काढताना कधीही आपला बॅलन्स चेक करुन घ्यावा. NEFT आणि RTGS या सेवा आता निशुल्क उपलब्ध आहेत. मात्र, IMPS व्यवहारासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागते. हे शुल्क ट्रान्सफर करण्यात येणाऱ्या रक्कमेवर अवलंबून असते.

<

Related posts

Leave a Comment