बारसु कोकणात होणार रिफायनरी प्रकल्प काय आहे. प्रकल्पाला विरोध का होतोय. रिफायनरी प्रकल्प समुद्र किनारावरच का असतो

बारसु कोकणात होणार रिफायनरी प्रकल्प काय आहे. प्रकल्पाला विरोध का होतोय. रिफायनरी प्रकल्प समुद्र किनारावरच का असतो

कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रण पेटले आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. स्थानिकांनी अगदी आरपारच्या आंदोलनाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे ‘बारसू’कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रस्तावित रिफायनरी जागेच्या सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध आहे. रिफायनरी प्रकल्पाला होणारा विरोध आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेने संघर्ष वाढलेला आहे. तूर्तास ग्रामस्थ व जिल्हा प्रशासनाच्या चर्चेची पहिली पार पडलीये. गुरुवारी पर्यावरण तज्ञ्ज यांच्या समवेत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. पण हा रिफायनरी प्रोजेक्ट नेमका काय आहे? यावरुन राजकारण का होतंय? कोणत्या पक्षाचं काय म्हणणं आहे, हे आपण समजून घेऊ…

रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे?

कोकणात राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या रद्द झालेल्या अधिसूचनेनंतर आता बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील आरामको सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणारी करणारी मोठी कंपनी आहे. या आरामको कंपनीबरोबर केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवरती प्रस्तावित आहे.

थोडक्यात तेल शुद्धीकरण करणारा हा मोठा प्रकल्प आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे. सध्या या प्रकल्पासाठी या ठिकाणी माती परीक्षणासाठी ड्रीलिंग सर्व्हेचे काम सुरू आहे. What is the refinery project to be done in Barsu Konkan? Why is there opposition to the project? Why is the refinery project located on the seashore?

ग्रामस्थांचा नेमका विरोध कशासाठी?

या परिसरातील ग्रामस्थांना आपल्या जागा या प्रकल्पासाठी द्यायच्या नाहीत. आमच्या येथील आंबा, मच्छी व्यवसाय, शेती हे सगळेच या प्रकल्पामुळे नष्ट होईल. हा प्रकल्प प्रदूषण करणारा आहे. त्यामुळे कोकणातील निसर्गाला, जैवविविधतेला, पर्यावरणाला या प्रकल्पाने बाधा पोहोचेल. त्यामुळे आमचा पारंपरिक शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, आंबा काजूच्या बागा नष्ट होतील, अशी भीती व्यक्त करत येथील ग्रामस्थांनी नियोजित प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. What is the refinery project to be done in Barsu Konkan? Why is there opposition to the project? Why is the refinery project located on the seashore?

What is the refinery project to be done in Barsu Konkan? Why is there opposition to the project? Why is the refinery project located on the seashore?

<

Related posts

Leave a Comment