पर्यावरण वाचूया जीवन सुखाने जगूया |Environment Day Let’s save nature and live happily
तापमान, अवेळी होणारे पर्जन्य, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, Environment Day; Let’s save nature and live happilyकमी झालेलं आयुर्मान , उष्माघातामुळे पडणारी बळी ,घटत चाललेली पाण्याची पातळी.पशु पक्षांची कमी झालेले प्रमाण. वेगवेगळ्या आजारांची संख्या अशा अनेक समस्या खरं तर पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असल्यामुळे उद्भभवआहेत. पूर्वीच्या काळात वृक्ष मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पावसाळा वेळेत होयचा. सध्या मात्र ऋतुमानात प्रचंड बदल झाले आहे कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी याची कारणे मानवाने शोधली पाहिजे आणि त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. Environment Day Let’s save the environment.
आज आपण पाहतोय 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान होत आहे. आणि शहरांमध्ये उष्माघाताने मृत्यू होत आहे सिमेंटचे जंगली निर्माण झाली आणि हे सर्व चक्र बदलूनच गेले त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आपल्या मित्रांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करणे व जोपासणे गरजेचे आहे. ऑक्सिजन जर मोठ्या प्रमाणात निर्माण केला नाही तर अनेक समस्या अजून निर्माण होतील. प्रत्येकानेच आपले कर्तव्य म्हणून वृक्ष लागवड करणे त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे.
आपण पाच जून या पर्यावरण दिनानिमित्त संकल्प करूया आपल्या परिसरामध्ये, घराच्या शेजारी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून उद्भवणाऱ्या समस्या कमी करू. वृक्षतोडीमुळे गावाची, समाजाची ,देशाची मोठी हानी होत आहे. कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेकांना आपले प्राण गमावू लागले. पैसा असूनही दवाखान्यात ऑक्सिजन बेड मिळाले नाहीत म्हणून अनेकांचे मृत्यू झाले. कृत्रिम ऑक्सिजन मिळण्यासाठी जर मानवाची एवढी धडपड होत असेल तर निसर्गातून मिळणाऱ्या ऑक्सिजनचा पण आपण विचार करायलाच हवा.झाडे ,पशु, पक्षी ,वेली यांचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे मनुष्याला वेळोवेळी सांगण्याची गरज आहे.
वृक्ष वाचवण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे .निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ राज्यभर वृक्ष लागवड ,वृक्ष संगोपन,मुठभर धान्य घोटभर पाणी,पर्यावरण संमेलन, पर्यावरण कार्यशाळा असे पर्यावरण वाचविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. पर्यावरण वाचले तरच सजीवसृष्टी वाचणार आहे.त्यामुळे आपण सर्वांनीच याकडे लक्ष देणे आणि यामध्ये आपलाही वाटा उचलणे गरजेचे आहे. ज्या लोकांना पर्यावरणाविषयी आवड आहे त्यांचे कार्य सुरू आहे अशांना आपण मदत करणे गरजेचे आहे.आपले कर्तव्य म्हणून सहभाग महत्त्वाचा आहे.
जीवन आनंदाने जगायचे असेल तर झाडे लावू झाडे जगवू .वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करूया . जागतिकीकरण, औद्योगीकरण, आधुनिकीकरण शहरीकरण यामुळे निसर्गाच्या सानिध्यातून आपण दुरावत चाललो आहोत. रासायनिक खतांचा वापर, प्लास्टिकचा वापर ,दूषित पाणी कारखान्याचे धुराडे यामुळे पर्यावरणाचा न भरून येणारा त्रास होत आहे.
मानव ,पशुपक्षी या सर्वांचाच विचार करून आपले आद्य कर्तव्य म्हणून कमीत कमी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरी झाड लावूया आणि ते जगूया .कुलरची हवा घेण्यापेक्षा झाडाच्या परिसरात आपण वावरूया .वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे|पक्षीही सुस्वरे| आळवती|| येणे सुख रुचे एकांताचा वास | नाही गुण दोष अंगी येत|| संत तुकाराम महाराज यांनी वृक्षाचे महत्व पटवून दिले आहे त्यामुळे आपण पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपला संकल्प निश्चित करूया .आपल्या सर्वांकडून हीच अपेक्षा आहे झाडे लावा झाडे जगवा.
ज्ञानेश्वर व्यंकटराव कऱ्हाळे — उपाध्यक्ष:- निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य.