बीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शनिवार (दि.२८) रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. All-party march in Beed to demand justice for the family of Sarpanch Santosh Deshmukh of Massajog
मस्ससाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेली होती. आज सर्व पक्षीय बैठकीमधील सर्व जातीय समाज बांधवांच्या भावना तीव्र होत्या ज्या पद्धतीने एखादा इसीस तथा तालीबानी अतिरेकी नक्षलवादी जसे हाल हाल करून क्रुरु पद्धतीने मारतात तशाच मानसिकतेने संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे या ठिकाणी तीव्र भावना लोकांमध्ये पसरलेले आहेत. सदरील प्रकरणातील सात रुपयांपैकी अद्याप पर्यंत फक्त चार आरोपी अटक झालेली असून अजून तीन आरोपी तात्काळअटक करण्यासाठी तसेच या गुन्हेतील मास्टरमाईंड यांना सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी. मोर्चा काढण्याचे नियोजन ठरलेले आहे.
स्व. संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांना स्व. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या बैठकीत अनेक मत सर्व उपस्थितांनी मांडले. देशमुख यांच्या निघृण हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करायला हवे असे मत या बैठकीत मांडले.
यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने २८ डिसेंबर २०२४ रोजी बीड मध्ये भव्य मोर्चा काढावा असे ठरवले गेले. भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर त्याचा शेवट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोलीस अधीक्षक कार्यालया जवळ होणार असे समजते.