The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th January Republic Day…
माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) गत अनेक वर्षापासून किनवट जिल्हा निर्मितीचे गुन्हाळ सुरु आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापूर्वी उपरोक्त नवजिल्ह्याच्या निर्मितीचा विषय चर्चेच्या पटलावर येत असतो. यंदाही तो मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन मांडवी व इस्लापूर तालुका नवनिर्मितीसह किनवट जिल्हा म्हणून घोषित होणार काय? याकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे. Kinwat district creation Public demand
महाराष्ट्रात आजघडीला ३६ जिल्हे अस्तित्वात आहेत. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यावेळी २६ जिल्हे होते. त्यानंतरच्या काळात ११ नविन जिल्ह्याची निर्मिती केली गेली. आणखी नव्याने २२ जिल्ह्यांची नव्याने निर्मिती करण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. त्यात नांदेड जिल्ह्याचे विभाजन करुन किनवट जिल्ह्याची नव्याने निर्मिती करणे आणि मांडवी व इस्लापूरला तालुक्याचा दर्जा देण्याचा समावेश आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे.
नांदेड ते किनवट है रस्ता अंतर १४० कि. मी. आहे. नांदेड या जिल्ह्याचे ठिकाणचे प्रशासकीय कामकाज असेल किंवा अन्य कोणते, त्यांना इतके अंतर पार करुन येणे परवडणारे नाही, त्यामुळे किनवटला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी त्या भागातील नागरिकांची मागणी आहे. दुसरे असे की, त्या त्या कार्यकाळात किनवटचे लोकप्रतिनिधीत्व केलेल्या आमदारांची सुध्दा हीच मागणी आहे. त्यावर येत्या २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी अंतिम निर्णय होईल, अशी चर्चा आहे.