MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय- महत्त्वाची बातमी!

MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय- महत्त्वाची बातमी!

Corona gives one year extension to sit for age limit MPSC exam

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्यात येणार आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्ष झालेल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवा अशी मागणी होती. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमडळाने निर्णय घेतला. यापुढे होणाऱ्या एमपीएससी परीक्षेत, ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे. त्या सर्वांसाठी एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री प्रस्ताव मागवून त्यावर सही करतील.

महत्त्वाच्या बातम्या

<

Related posts

Leave a Comment