वसईतील तरुणी श्रध्दा वालकरची प्रियकराने दिल्लीत निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले

वसईतील तरुणी श्रध्दा वालकरची प्रियकराने दिल्लीत निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले

वसई : वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. हा निर्मम गुन्हा सहा महिन्यांनंतर उघडकीस आला. मृत तरुणी वसईची असून तिचे नाव श्रद्धा वालकर असे आहे. Shraddha Walker, a girl from Vasai, was brutally murdered by her boyfriend in Delhi and dismembered into 35 pieces.

तिने प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संबंधित तरुणीच्या शरीराचे काही तुकडे दिल्ली पोलिसांना सापडल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. Shraddha Walker, a girl from Vasai, was brutally murdered by her boyfriend in Delhi and dismembered into 35 pieces..

श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी २०१९पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. Shraddha Walker, a girl from Vasai, was brutally murdered by her boyfriend in Delhi and dismembered into 35 pieces.

मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन तसेच सर्व समाजमाध्यमांची खाती बंद होती. यामुळे तिच्या वडिलांना माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली. Shraddha Walker, a girl from Vasai, was brutally murdered by her boyfriend in Delhi and dismembered into 35 pieces.

माणिकपूर पोलिसांच्या तांत्रिक तपासात श्रद्धाचा फोन मे पासूनच बंद असल्याचे आढळले. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावले होते. ‘‘ती भांडण करून घरातून निघून गेली, पण कुठे गेली ते मला माहीत नाही’’, असे उत्तर त्याने पोलिसांना दिले. परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली आणि त्यांचा संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने माणिकपूर पोलिसांनी आफताबची कसून चौकशी केली असता श्रद्धाच्या हत्येचा गुन्हा उजेडात आला, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगितले. Shraddha Walker, a girl from Vasai, was brutally murdered by her boyfriend in Delhi and dismembered into 35 pieces.

वेबसीरिज पाहून कट..

श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाडय़ाच्या घरात रहात होते. तिने लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची मेमध्ये गळा दाबून हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. एक बेवसीरिज पाहून त्याने तिच्या हत्येचा कट रचला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे पोलिसांनी सांगितले. Shraddha Walker, a girl from Vasai, was brutally murdered by her boyfriend in Delhi and dismembered into 35 pieces.

https://youtu.be/wkb3LLa5OfI
<

Related posts

Leave a Comment