ब्राह्मण असल्याचा बुद्धीजिवी असल्याचा गर्व आहे – अमृता फडणवीस
नाशिक : ब्राह्मण महासंघ जात- धर्म, पंथ बाजूला ठेऊन अनेकांसाठी झटतो. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतो. ब्राह्मण असल्याचा गर्व आहे, परंतु आम्हाला आमची मार्केटिंग करता येत नाही., असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं.अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे ‘दीपावली स्नेहमिलन 2022’ कार्यक्रम नाशिक येथे झाला. या कार्यक्रमात त्या बोलता होत्या. Amrita Fadnavis is proud to be a Brahmin and an intellectual
प्रभू श्रीरामाचे नाशिकला चरण लागले. या नगरीत येऊन मला धन्य वाटते आहे. याच पंचवटीत गेल्या बारा वर्षांपासून समाजाच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. त्या कामाची जबाबदारी डॉ. भारती पवार यांच्यासह स्थानिक आमदार यांच्यावर सोपवते. नेशन फर्स्ट हे आपले ब्रीद असल्याने, शुक्ल यजुर्वेद संस्थेची इमारत उभी करण्यासाठी कोण मध्ये येतो ते मी बघते. जे अधिकारी हे काम थांबवत आहेत त्यांची नावे मला कळवा मी पुढे बघते, असा दमही अमृता फडणवीसांनी यावेळी भरला.
महत्त्वाच्या —-
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरल
- छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंत
- नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावा
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

