माहूर,अर्धापूर, नायगाव नगरपंचायत प्रभाग रचना, आरक्षण निश्चितीबाबत आक्षेप, हरकती, सूचना असल्याचा सादर करण्याचे आवाहन

माहूर,अर्धापूर, नायगाव नगरपंचायत प्रभाग रचना, आरक्षण निश्चितीबाबत आक्षेप, हरकती, सूचना असल्याचा सादर करण्याचे आवाहन

Mahur, Ardhapur, Naigaon Nagar Panchayat Ward Formation, Reservation Confirmation Objections, Objections, Suggestions for Submission

माहूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांच्याकडे शुक्रवार 12 ते मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावीत. या मुदती नंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील माहूर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडत कार्यक्रम 2021 हा राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2021 रोजी जाहिर केला आहे.

आयोगाने ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार माहूर नगरपंचायतीच्या एकुण प्रभागापैकी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिलांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी आरक्षण निश्चित केले आहे. प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी माहूर नगरपंचायत येथे उपलब्ध आहेत. तसेच सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपंचायत क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Mahur, Ardhapur, Naigaon Nagar Panchayat Ward Formation, Reservation Confirmation Objections, Objections, Suggestions for Submission

नायगाव नगरपंचायतीच्या सुधारीत आरक्षण व सोडत निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव यांच्याकडे शुक्रवार 12 ते मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावीत. या मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नायगाव नगरपंचायतीच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार नायगाव नगरपंचायतीच्या परिक्षेत्रातील नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी आरक्षण निश्चित केले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी नायगाव नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे. सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपंचायत क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. Mahur, Ardhapur, Naigaon Nagar Panchayat Ward Formation, Reservation Confirmation Objections, Objections, Suggestions for Submission

अर्धापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील ते त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपंचायत अर्धापूर यांच्याकडे शुक्रवार 12 ते मंगळवार 16 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावीत. या मुदती नंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडत कार्यक्रम 2021 हा राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2021 रोजी जाहिर केला आहे.

आयोगाने ठरवून दिलेल्या आरक्षणाच्या प्रमाणानुसार अर्धापूर नगरपंचायतीच्या एकुण प्रभागापैकी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण महिलांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी आरक्षण निश्चित केले आहे. प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाशांच्या माहितीसाठी अर्धापूर नगरपंचायत येथे उपलब्ध आहेत. तसेच सदस्य पदाच्या आरक्षणाची प्रसिद्धी नगरपंचायत क्षेत्रातील प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.Mahur, Ardhapur, Naigaon Nagar Panchayat Ward Formation, Reservation Confirmation Objections, Objections, Suggestions for Submission

<

Related posts

Leave a Comment