भारतात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता अँटीव्हायरल कैप्सूल, आपत्कालीन वापरासाठी लवकरच मंजुरी

भारतात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आता अँटीव्हायरल कैप्सूल, आपत्कालीन वापरासाठी लवकरच मंजुरी

Soon oral medicine for coronavirus treatment in India, Merck, Covid task force

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी भारतात आतापर्यंत कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लस हा एकमेव पर्याय आहे. पण लवकरच, ओरल अँटीव्हायरल कैप्सूल (oral antiviral capsule), सौम्य ते मध्यम लक्षणं असणाऱ्या COVID-19 रूग्णांच्या उपचारासाठी परवानगी दिली जाऊ शकते. कोविड स्ट्रॅटेजी ग्रुप, सीएसआयआरचे अध्यक्ष डॉ राम विश्वकर्मा म्हणाले की, मर्कचे (Merck) अँटीव्हायरल औषध मोलनुपिरावीरला (Molnupiravir) येत्या काही दिवसांत आपत्कालीन वापरासाठी मंजूरी मिळू शकते. मात्र, फायझरची कैप्सूल, पॅक्सलोविडलासाठी (Paxlovid) आणखी काही वेळ लागू शकतो. वैज्ञानिक दृष्ट्या, ही औषधं विषाणूच्या खातमा करण्यासाठी एक मोठं पाऊल ठरेल. मोलनुपिरावीर कैप्सूल भारतात लवकरच उपलब्ध असेल, ते म्हणाले. (Soon oral medicine for coronavirus treatment in India)

सुरुवातीला 2000 ते 4000 रुपयांपर्यंत किंमत असेल
डॉ राम विश्वकर्मा म्हणाले की मोलनुपिरावीर कैप्सूल भारतात वापरण्यासाठी पुढील महिन्यात निर्णय होण्याची शक्याता आहे. औषधाच्या किमतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, सुरुवातीला किंमत 2000 ते 4000 रुपयांपर्यंत असू शकते आणि नंतर किंमत 500 ते 1000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.

ब्रिटन ही गोळी मंजूर करणारा पहिला देश
युरोपियन युनियनच्या फार्मास्युटिकल एजन्सीने COVID-19 च्या उपचारासाठी, मर्कच्या कैप्सूलचं समीक्षाण सुरू केले आहे. अधिकृत मान्यता मिळण्यापूर्वी, हे औषद वापरण्यास इच्छिणाऱ्या राष्ट्रीय गटातील 27 देशांना लकरच त्याबाबत सुचीत केले जाईल.

सध्या, COVID-19 उपचारांना IV किंवा इंजेक्शनची आवश्यकता असते. मर्कची कैप्सूल कोविड-19 च्या उपचारायाठी मंजूर करणारा ब्रिटन पहिला देश आहे. ब्रिटनने गुरुवारी ही मंजूरी दिली. 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना ही गोळी वापरण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. सौम्य ते मध्यम कोविड-19 ची लक्षणं असणाऱ्या रूग्णांसाठी या औषधाच्या दिवसातून दोनदा चार गोळ्या, असा पाच दिवसांसाठी याचा डोस आहे.

==============================================================================================

<

Related posts

Leave a Comment