Health Tips | उन्हाळ्यात अशी घ्याल आरोग्याची काळजी ?

Health Tips | उन्हाळ्यात अशी घ्याल आरोग्याची काळजी ?

निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणं स्वाभाविक असतं, निसर्गाच्या नियमानुसार बदल होतच असतात ते आपल्या हातात नसतं. मात्र या बदलांना जुळवून घेणं आपल्या हातात असतं. उन्हाळ्याच्या काळात उष्णता वाढल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवतात त्यातून डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. पण ऋतूमानानुसार आहारशैलीत बदल केल्यास आरोग्य चांगलं राहातं. यासाठीच हा आहार नेमका कसा असावा, आहारसूत्रात कोणता बदल करावा, हे जाणून घेऊया.

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता वाढते आणि त्याचा शरीरावर बदल होतो. डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, अॅसिडिटी, डोकं दुखणं, अस्वस्थ वाटणं, थकवा जाणवणं या समस्या उद्भवतात. आपापल्या प्रकृतीनुसार, तसंच आहार-विहारानुसार ही लक्षणं कमी-अधिक असू शकतात. मात्र या वातावरणाशी जुळवून घेणं थोडंसं कठीण होतं.

आपलं शरीर या बदलांना जुळवून घेत शरीराच तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करते. मेंदूतील हायपोथॅलिमस हा भाग हे तापमान नियंत्रित करतो. शरीरात पाण्याची कमतर जाणवू लागल्यास स्नायूंच्या प्रणालीद्वारे हा संदेश मेंदूला पोहोचवला जातो आणि तहान भागवण्याची क्रिया घडते.

खूप थंडी असो किंवा उष्णता शरीराचं तापमान एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नियंत्रित केलं जातं. मात्र ही पातळी नियंत्रित राखण्याची यंत्रणा नीट काम करु न शकल्यास समस्या उद्भवतात. जसं उन्हाळ्यात घाम येऊन हे तापमान योग्य राखलं जातं, मात्र यासाठी शरीराला आवश्यक पाणी मिळणं गरजेचं असतं. या काळात शरीरातील पाण्याचं कमी प्रमाण कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम चयापचय क्रियेवर होऊन हिटस्ट्रोक, सनस्ट्रोक होऊन अस्वस्थ वाटणं, ग्लानी येणं, प्रचंड डोकेदुखी, रक्तदाब वाढणं किंवा कमी होणं, त्वचा कोरडी पडणं ही लक्षणं दिसू लागतात.

यात शरीरातील मीठ आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं, ज्याला हायपोनेट्रिमिया म्हणतात. ही लक्षणं गंभीर स्वरुप धारण करून कधी कधी ते जीवावरही बेतू शकतं. पण त्यात योग्य बदल केल्यास उन्हाळा सुखकर करता येतो. उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी नेमके कोणते उपाय योजायचे त्याची महिती आपण पुढील भागात घेऊया

========

<

Related posts

Leave a Comment