सदावर्तेला दोन दिवसाची पोलीस कोठडी

सदावर्तेला दोन दिवसाची पोलीस कोठडी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल, शुक्रवारी रात्री सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महेश वासवानी यांनी सदावर्तेंची बाजू मांडली. (ST Worker Strike) ही कारवाई रोषातून सुरू असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्यावतीेने 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Killa Court sent Gunratna Sadavarte In Police Custody)

काय म्हणाले सदावर्तेंचे वकील?

सदावर्तेंचे वकील : सरकारने कामगारांबाबत योग्य भूमिका नव्हती. पहिल्या दिवसांपासून कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नव्हत्या. कित्येक कामगारांनी आत्महत्या केली. मात्र सरकारने त्यांची दखलही घेतली नाही. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका कायम सरकारच्या विरोधात राहिली आहे. हायकोर्टात सदावर्तेंवर हल्लाही झाला आहे. सदावर्ते हे एक प्रसिद्ध वकील आहेत. सदावर्तेंकडे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्याही केसस आहेत.

‘बोललेलं वाक्य आणि गुन्ह्यातील एफआयआर जबाब वेगळा’

सदावर्तेंचे वकील : न्यायलयाचा निकाल ७ तारखेला आला. त्यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेपार्ह भाषण केले असे जबाबात म्हटलं आहे. मात्र गुन्ह्यातील जबाबात वापरलेले शब्द आणि प्रत्यक्षात गुणरत्न यांनी म्हटलेलं वाक्य यात तफावत आहे. गुन्ह्यात शरद पवारांच्या बंगल्यात घुसण्याची भाषा केली आहे. मात्र मुलाखतीत तसे शब्दच वापरलेले नाहीत, असा युक्तीवाद गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांमार्फत करण्यात आला.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी नरेंद्र राणे, बबन कनवजे यांनी ‘हे सगळे भाजपचे कारस्थान आहे. या आंदोलनास फडणवीस कारणीभूत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात संधी दिली होती. त्यावेळी त्यांनी जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन चर्चा करायला हवी होती. 

मात्र, कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन भरकटवले गेले. शरद पवार यांची प्रतिमा बिघडविण्यासाठीच हे कारस्थान केले जात आहे. यामागे भाजप, देवेंद्र फडणवीस आणि सदानंद गुणवर्ते हे जबाबदार

<

Related posts

Leave a Comment