रामायणातुन काय शिकावे|What to learn from Ramayana?

रामायणातुन काय शिकावे|What to learn from Ramayana?

नमस्कार मित्रानों हिंदू धर्मातील वेद, ग्रंथ, उपनिषदे या मधून मनुष्य जीवन प्रवासात लागणारे नीतीमूल्य चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण मिळते. आज आपण रामायण कथेतून काय शिकले पाहिजे ते पाहाणार आहोत. What to learn from Ramayana?

तुम्ही कितीही विद्वान पंडीत असाल परंतु तुमची एक चुक तुम्हाला उध्वस्त करेल. रावण हुशार होता परंतु त्याने सितेचे अपहरण केले व त्याचा उलट काळ सुरू झाला. कधीच कोणावर विश्वास करु नका. विभीषणाने रावणाचे रहस्य सांगितल्याने तो संपला. परिस्थिती कधिही बदलु शकते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवा. प्रभु श्रिरामचंद्राना महालातुन वनवासात जावे लागले. बंधुप्रेम असावे तर लक्ष्मणाप्रमाणे, भावासाठी पत्नी व लहान मुलाचा त्याग करुन वनवासात आला. प्रभु श्रिरामचंद्रानी बालीचा वध केला तरीसुध्दा बालीचा मुलगा अंगद याने श्रिरामास मदत केली.

अहंकार व सुडबुध्दि कामीचा नसतो. बाली अहंकारी होता.हिंदीत एक म्हण आहे “राम वन गए थे अपने राम की तलाश मे” संघर्ष तुम्हाला यश व स्वतःची कुवत सामर्थ्य किती आहे हे दाखवितो. भावाची काळजी लक्ष्मणा प्रमाणे करावी १४ वर्ष लक्ष्मणाने प्रभू राम आराम करताना त्यांची काळजी घेतली. कुठलेही कार्य करण्या अगोदर पुर्वतयारी करा. हनुमानाने स्वतः लंकेत जाऊन तिथली इंतभुत माहिती घेतली.चांगल्या लोकांना घरात प्रवेश द्या. अयोध्येत मंथराने कैकईच्या मनात विष कालवले. कितीही ताकद असुद्या परंतु नम्र रहा. हनुमान एकटाच सितेला घेऊन येऊ शकला असता परंतु हा अधिकार श्रिरामांचा होता. वाचा विस्तारित खालील प्रमाणे.

रामायणातुन हे शिकले पाहिजे ? What to learn from Ramayana?

१. तुम्ही कितीही विद्वान असाल परंतु तुमची एक चुक तुम्हाला उध्वस्त करेल.

रावण हुशार होता परंतु त्याने सितेचे अपहरण केले व त्याचा उलट काळ सुरू झाला. रावणाचे सल्लागार बुद्धिमान होते. पदोपदी योग्य सल्ला देऊन सुद्धा केवळ मिथ्या अहंकारापोटी रावणाने त्यांचा अव्हेर केला. शेवटी तो अहंकारच त्याच्या शेवटाचे कारण ठरला. What to learn from Ramayana?

२. कधीच कोणावर विश्वास करु नका.

बिभीषणाने रावणाचे रहस्य सांगितल्याने तो संपला. गृह कलह पुढे अंतिम नाशाला कारणीभूत होतो. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना समजून घ्या. कुटुंब एकसंध ठेवा . What to learn from Ramayana?

३. परिस्थिती कधिही बदलू शकते त्यामुळे प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायची तयारी ठेवा.

उद्या राज्याभिषेक सर्व निश्चित पण सकाळी प्रभू श्रीरामचंद्राना महालातुन वनवासात जावे लागले. What to learn from Ramayana?

४. बंधुप्रेम असावे तर लक्ष्मणाप्रमाणे

भावासाठी पत्नी व मातेचा त्याग करुन वनवासात आला. सेवाभावी राहिला. रामाबरोबर सर्वत्र लक्ष्मणाची मूर्ती प्रस्थापित झाली. केवळ सन्मार्गाने गेल्याने पूजनीय झाला. What to learn from Ramayana?

५.प्रभूश्रीरामचंद्रांनी वालीचा वध केला तरीसुध्दा वालीचा मुलगा अंगद याने श्रीरामास मदत केली.

अहंकार व सुडबुध्दि कामीची नसते. वाली अहंकारी होता. म्हणून त्याचा नाश झाला. सत्ता ,संपत्ती व अहंकार कितीही बलवान असेल तरी धर्म त्याला संपवतो . What to learn from Ramayana?

६. हिंदीत एक म्हण आहे “राम वन गए थे अपने राम की तलाश मे”

संघर्ष तुम्हाला यश व स्वतःची कुवत सामर्थ्य किती आहे हे दाखवितो. रामाने वनवास ही सुद्धा आपल्या आयुष्यातील संधी मानली. केवळ नशिबाला दोष देऊन काहीच होत नाही. परमेश्वर जे करतो ते आपल्या कल्याणासाठीच याची खात्री बाळगली पाहिजे. What to learn from Ramayana?

७. भावाची काळजी लक्ष्मणा प्रमाणे करावी.

१४ वर्ष लक्ष्मणाने श्रीराम वनवासात असताही 14 वर्षे आराम न करताना आपल्या जेष्ठ भावाची सेवा केली. भरत म्हणजे प्रत्यक्ष धर्म मूर्ती त्याने अनुकूल परिस्थती येऊन सुद्धा ती अनिताच्या मार्गाने आली म्हणून नाकारली. म्हणून अनेक युग येतील व जातील पण भरताचा त्याग कोणीही विसरणार नाही. What to learn from Ramayana?

८. कुठलेही कार्य करण्या अगोदर पूर्वतयारी करा.

हनुमानाने स्वतः लंकेत जाऊन तिथली इत्यंभूत माहिती घेतली. आपल्या राजाचे आज्ञेबाहेर गेला नाही. सेवक असा आज्ञाधारक असावा. एक आदर्श सेवक म्हणून पूजनीय झाला. What to learn from Ramayana?

९. चांगल्या लोकांना घरात प्रवेश द्या.

अयोध्येत मंथरेने कैकईच्या मनात विष कालवले व हसते खेळते कुटुंब उद्वस्त झाले. आपले कार्य करताना कुटुंबाची रीत , रिवाज व सन्मान यांचा आदर करावा. जेष्ठांचे विचार हे अनुभवाचे असतात ते पाळण्यातच कुटुंबाचे हित असते. रावणाने कैकसी आणि मल्यावानाचा सल्ला नाकारला. तर श्रीरामांनी पितृआज्ञा हे जीवनाचे ध्येय मानले What to learn from Ramayana?

१०. कितीही ताकद असुद्या परंतु नम्र रहा.

हनुमान एकटाच सितेला घेऊन येऊ शकला असता परंतु हा अधिकार श्रीरामांचा होता.

११. मित्र निषधराज ,सुग्रीव , बिभीषण यांचेसारखे ठेवा

जे दुःख व सुखात आपले सोबती राहतील. आपल्या पूर्ण ताकतीनिशी तुमच्या पाठीशी उभे राहतील.

१२.कायम आपल्या बरोबर मंत्री सुमंता सारखे सल्लागार ठेवा ते कोठल्याही प्रसंगी संधीचा फायदा न घेता योग्य सल्ला देतील.

त्यांना आनंद व दुःख या दोन्ही परिस्थितीचे भागीदार बनवा .

१३ प्रभो रामचंद्रांनी संत सत्पुरुष व गुरुजनांचा आदर केला. कायम सत्संग ठेवला त्यांचे आशीर्वाद घेतले.

यश हे सदगुरु कृपेनेच येते.

१४ आदर्श वागणूक ही त्वरित यश देणार नाही पण ती सोडता कामा नये

कारण अंतिम विजय हा सत्य व सन्मार्गाचाच होतो हे मात्र अटळ सत्य आहे.

<

Related posts

Leave a Comment