राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल ‘त्या’ न सांगितलेल्या गोष्टी, ज्या कदाचित तुम्हाला आतापर्यंत माहित नसतील

राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल ‘त्या’ न सांगितलेल्या गोष्टी, ज्या कदाचित तुम्हाला आतापर्यंत माहित नसतील

Those’ untold stories about Father of the Nation Mahatma Gandhi, which you may not know till now

राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 152 वी जयंती आहे. यावेळी देशभरात अनेक कार्यक्रम होतात, महात्मा गांधींच्या कार्याचा गौरव केला जातो. 2 ऑक्टोबरला राष्ट्रीय सुट्टी असते, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधींचं योगदान फार मोठं आहे, त्यांच्या अहिंसेच्या मार्गाने सगळ्या जगाला प्रभावित केलं, हे आपल्या सर्वांना माहित आहे. मात्र महात्मा गांधींबद्दलच्या काही गोष्टी अशा आहेत, ज्या फार कमी लोकांना ठावूक असतील. त्याच गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. There are some things about Mahatma Gandhi that very few people know. We are going to tell you the same thing today.

भारतात महात्मा गांधींची जयंती हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो,मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरही महात्मा गांधींच्या जयंतीला फार महत्त्व आहे. जगभरात 2 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. ज्या अहिंसेसाठी महात्मा गांधी आपलं अख्खं आयुष्य घालवलं, त्याच अहिंसेचा प्रसार जगभरात व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. महात्मा गांधींशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळणं शक्य झालं नसतं, त्यांच्या विचारांना स्वातंत्र्यांची आग तेवत ठेवली आणि अखेर इंग्रजांना देश सोडावा लागला.

2 ऑक्टोबर 1869 ला गुजरातच्या पोरबंदरमध्ये महात्मा गांधींचा जन्म झाला. सुरुवातीला त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. भारतात परतल्यानंतर त्यांनी इंग्रजांविरोधात बंड पुकारलं आणि आपल्या विचारसरणीने लोकांना एकत्रित आणलं. मात्र हे करताना शांतता आणि अहिंसा हे 2 शब्द त्यांनी कधीही सोडले नाही. देशाच्या सर्व भागातील लोकांना एकत्र करुन त्यांनी 1930 मध्ये दांडी यात्रा काढली. एवढंच नाही तर 1942 च्या भारत छोडो आंदोलनापुढे ब्रिटीशांना हात टेकावे लागले. ज्यानंतर ब्रिटीशांनी भारताला स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला.

जगभरात गांधी जयंती साजरी होते
भारतातच नाही तर जगभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते. जगभरात अहिंसा आणि मानवतेला मानणारे स्ट्रिट शो करतात, आणि इतिहासाला उजाळा देतात. महात्मा गांधी हे अहिंसेचे कट्टर समर्थक होते, त्यामुळे त्यांचे हे विचार आजही तरुणांसाठी प्रेरणा देणार आहे. There are some things about Mahatma Gandhi that very few people know. We are going to tell you the same thing today.

महात्मा गांधींबद्दलच्या भन्नाट गोष्टी
हात्मा गांधींपासूनच प्रेरणा घेऊन जगाच्या 4 खंडातील 12 देशात नागरी हक्क चळवळ उभी राहिली.
महात्मा गांधींना सन्मान देण्यासाठीच अॅपलचे सह-संस्थापक स्टिव्ह जॉब्ज हे महात्मा गांधींसारखा चष्मा घालायचे.
महात्मा गांधींचा सन्मान करण्यासाठी, गांधींच्या मृत्यूनंतर 21 वर्षांनंतर ग्रेट ब्रिटनने एक तिकीट जारी केलं.
1930 मध्ये जेव्हा गांधींजीना यूएस रेडीओवर मुलाखतीसाठी बोलावलं, तेव्हा त्यांनी माईककडे पाहून म्हटलं,’ मला गोष्टीमध्ये बोलायचे आहे का?’
फोर्ड कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड हे गांधींचे समर्थक होते, तेव्हा ते भारतातील एका पत्रकाराने त्यांना भेट दिलेला चरखा रोज फिरवत.
गांधींनी महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती.
आतापर्यंतचे महात्मा गांधी असे पहिले भारतीय आहे, ज्यांना ”टाईम पर्सन ऑफ द इयर” ही पदवी देण्यात आली आहे. 1930 ला त्यांना हा सन्मान देण्यात आला होता.
महात्मा गांधी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 5 वेळा नामांकीत झाले, पण त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही.
महात्मा गांधींच्या निधनानंतर जेव्हा अंतयात्रा काढण्यात आली, ती अंतयात्रा तब्बल 8 किलोमीटर लांब होती.

<

Related posts

Leave a Comment