Delta plus variant symptoms & treatment |डेल्टा प्लस व्हायरस लक्षणे व उपाय

Delta plus variant symptoms & treatment |डेल्टा प्लस व्हायरस लक्षणे व उपाय


कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून लोकं सावरत असतानाच कोविडच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटने भारतात हातपाय पसरायला सुरुवात केलीय. हा नवीन डेल्टा प्लस व्हायरस झपाट्याने पसरत आहे.नवीन डेल्टा प्लसची बऱ्याच केसेस महाराष्ट्र मध्ये आढळले आहेत.अशा परिस्थितीत लोकांमध्ये एकामागून एक संकट आल्याने भितीचं वातावरण दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस प्रकार काय आहे आणि त्याची लक्षणे कोणती आहेत? जाणून घ्या.



कोरोनाचा नवीन डेल्टा प्लस प्रकार काय आहे? What is the new Delta Plus type of Corona?

कोरोनाचा नवीन डेल्टा प्रकार म्हणजेच B.1.617.2 प्रथम भारतात आढळला. कोरोना विषाणूच्या स्वरूपात बदलांमुळे, डेल्टा प्लस प्रकार तयार झाला आहे. हा विषाणू प्रथम युरोपमध्ये आढळला होता. स्पाइक प्रोटीन हा कोरोना विषाणूचा मुख्य भाग आहे. ज्याच्या मदतीने हा विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतो.


नवीन व्हेरियंटमध्ये सर्वात धोकादायक गोष्टी म्हणजे तो आतापर्यंतच्या सर्व प्रकारांमध्ये सर्वात वेगवान पसरत आहे. अल्फा प्रकारही वेगवान पसरत असला तरी, डेल्टा प्रकार 60 टक्के अधिक संसर्गजन्य आहे.

कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारची लक्षणे Symptoms of corona delta plus type ?
कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरियंटमध्येही बरीच लक्षणे दिसू लागली आहेत.
कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटची सामान्य लक्षणे म्हणजे
1)ताप
2)कोरडा खोकला
3)थकवा.
कोरानाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या तीव्र लक्षणांमध्ये
4)छातीत दुखणे
5)धाप लागणे
6)श्वास घेण्यास त्रास होणे
याशिवाय
7)त्वचेवर पुरळ उठणे
8)बोटांच्या रंगात बदल यासारखे लक्षणेही दिसून येतात.
सामान्य लक्षणांमध्ये
9)घसा खवखवणे
10)चव आणि गंध कमी होणे
11)डोकेदुखी आणि अतिसार यांचा समावेश आहे.


कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट कसा टाळता येईल?

1)घराबाहेर पडताना दुहेरी मास्क घाला.
2)आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा.
3)20 सेकंद तरी साबणाने आपले हात स्वच्छ धुवा.
4)सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.
5)लोकांपासून 6 फूट अंतर ठेवा.
6)घरातल्या आणि आसपासच्या वस्तू निर्जंतुकीकरण ठेवा.
7)बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा आणि त्वरित स्पर्श करू नका.



लसीकरण महत्वाचे
लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती निर्माण होईल.त्यामुळे कोरोना संसर्गाचा वेग मंदावेल.

हे ही लेख वाचा—————

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice