महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांचे श्वानप्रेम सगळ्यांनाच ठाऊक आहे. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी असलेल्या त्यांच्या लाडक्या जेम्सचं सोमवारी रात्री निधन झालं.
जेम्सच्या निधनानं ठाकरे कुटुंब भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रेट डेन जमातीचा जेम्स कित्येक वर्ष राज ठाकरेंसोबत होता. मात्र वाढत्या वयामुळे जेम्सनं अखेरचा श्वास घेतला.
जेम्सच्या निधनानंतर राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसून आले. कुटुंबीयांकडून जेम्सच्या अंत्ययात्रेसाठी हार, फुलं आणि शाल अर्पण करून त्याला निरोप देण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरेंकडे जेम्स आणि बॉन्ड नावाचे ग्रेट डेन प्रजातीचे श्वान आहेत.
राज ठाकरे यांनी नेहमी लहान मुलांप्रमाणे जेम्सला लळा लावला होता. या दोन्ही श्वानाच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी एक ट्रेनरला ठेवला होता.
राज ठाकरेंचे आणि जेम्सचे अनेक फोटो बऱ्याचदा सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं दिसून आलं होतं. राज ठाकरेंप्रमाणे त्यांचा मुलगा अमित ठाकरे यालाही श्वानाबद्दल अतिशय प्रेम आहे. अमित ठाकरे यांच्याकडे मुफासा आणि ब्ल्यू या नावाचे श्वान आहेत.
हे ही लेख वाचा ——–
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर… Read more: जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
