कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य- खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, १९४७ मध्ये तर भीक दिली

कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य- खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, १९४७ मध्ये तर भीक दिली

True freedom was achieved in 2014, in 1947 begging was done; Kangana’s controversial statement

मुंबई : नुकतेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आणखी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, १९४७ मध्ये तर भीक दिली असं विधान कंगनाने केलं. तिने केलेल्या या विधानावरून सोशल मीडियावर टिका व्यक्त केली जात आहे. True freedom was achieved in 2014, in 1947 begging was done; Kangana’s controversial statement

दरम्यान कंगनाने सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानीवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीख होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं असं म्हणाली. कंगनाच्या उत्तरावर निवेदिका नाविका कुमार म्हणाल्या, म्हणूनच सगळे तुला म्हणतात की तू भगवा आहेस. त्यावर कंगना म्हणते,आता या विधानानंतर माझ्यावर आणखी १० केसेस होणार आहेत.

सोशल मीडियावर तिच्या विधानावर टाळ्या वाजवणारे मूर्ख कोण आहेत, हे मला जाणून घ्यायचंयअसं ट्विट अभिनेत्री स्वरा भास्करने केलं. तर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या, ‘मानसिकदृष्ट्या स्थिर नसलेला विक्षिप्त व्यक्तीच आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याला भीक म्हणू शकतो. या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी आपलं बलिदान दिलं. असो, अशा लोकांकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? नाविकाजी यांनी स्वातंत्र्यासाठी वापरलेल्या अशा वक्तव्यावर आक्षेप का नाही घेतला? तुमच्याकडूनही अपेक्षा करणं चुकीचं आहे का?’ True freedom was achieved in 2014, in 1947 begging was done; Kangana’s controversial statement

कंगनाच्या वक्तव्यावर माजी आयपीएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी ‘म्हणूनच म्हटलं होतं, पैसाप्रसिद्धी मिळाली तर सोनू सूद बना, कंगना नाही’, असं ट्विट केलं. तसेच अशा लोकांना पद्मश्री देणाऱ्या मोदींजींनी उत्तर द्यावं, की आपण अनेकांच्या बलिदानानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचं ७५वं वर्ष साजरा करतोय, की तुमच्या भक्तांनुसार भीक म्हणून मिळालेल्या स्वातंत्र्याचं असा सवाल काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केला आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावर सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी तिच्यावर टिका करीत आहेत.True freedom was achieved in 2014, in 1947 begging was done; Kangana’s controversial statement

महत्त्वाच्या बातम्या

Related posts

Leave a Comment