त्रिपुरातील घटनेवरुन मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडीत मोर्चाला हिंसक वळण, मुस्लिम मोर्चेकरांकडुन असंवेदनशीलतेच दर्शन

त्रिपुरातील घटनेवरुन मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडीत मोर्चाला हिंसक वळण, मुस्लिम मोर्चेकरांकडुन असंवेदनशीलतेच दर्शन

Violent turn to Malegaon, Nanded, Amravati, Bhiwandi Morcha due to incident in Tripura, insensitivity shown by Muslim Morchakars

मुंबई : त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमरावती, मालेगाव, भिवंडीत आणि नांदेडमध्ये प्रचंड मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्याला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रू धुराचा वापर करावा लागला. त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चा करांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.

अमरावती मध्येही तोडफोड या घटनेचे हिंसक पडसाद उमटल्याने अमरावतीतील परिस्थिती तणावपूर्ण आहे. त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबरांबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याची वार्ता वाऱ्या सारखी पसरल्यानंतर मुस्लिम समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला. अमरावतीत मुस्लिम कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा जोरदार निषेध नोंदवला. बघता बघता हजारो मुस्लिम बांधव एकत्र गोळा झाले आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना वाटतेतील दुकाने जबरदस्थीने बंद करण्यात आली. दुकाने बंद करण्यास नकार दिल्याने दुकानांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

नांदेडमध्येही तोडफोड
नांदेडमध्ये आज विविध मुस्लिम संघटनांनी एकत्र येत बंद पाळला. यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या आंदोलकांनी जोरदार नारेबाजी केली. मात्र या बंद दरम्यान शहरात काही ठिकाणी समाज कंटकानी दगडफेक करत तणाव पसरवलाय. देगलूर नाका भागात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आलीय, तर काही खाजगी वाहने देखील समाज कंटकांनी फोडली आहेत. तर याच समाज कंटकाच्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. दरम्यान, पोलिसांनी अश्रू धुरांच्या नळकांड्यांचा आणि बळाचा वापर करत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरून तणाव निर्माण झालाय. पोलिसांनी अटकसत्र राबवण्यास सुरुवात केली असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

मालेगाव मध्येही तोडफोड
त्रिपुरा राज्यात आयोजित एका रॅलीमध्ये पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मुस्लिम समाज आक्रमक झाला असून रॅली मार्फत याचा निषेध नोंदवण्यात येत होता. नाशिकमधील मालेगावातही मुस्लिम संघटनांनी बंद पुकरला होता. या बंदला सायंकाळी गालबोट लागले. आंदोलकांकडून रॅली दरम्यान दगडफेक करण्यात आली.

त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ आज मालेगावातील काही मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला मालेगावसह मनमाडमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून त्रिपुरा येथील घटनेचा निषेध केला. दुपारपर्यंत सर्व बंद सुरळीत सुरु होता. बंद शांततेत पार पाडत हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम संघटनांनी केली. मात्र काही ठिकाणी याला अपवाद दिसला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरुच ठेवली होती. या दुकानदारांवर दबाव टाकून बळजबरीने दुकाने बंद करण्याच्या आणि मोर्चा काढण्याच्या उद्देशाने काही लोक नवीन बस स्थानक परिसरात एकत्र गोळा झाले होते. मात्र पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवले आणि माघारी पाठवले. यामुळे जमावातील लोकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही जमावावर सौम्य लाठी चार्ज केला. Violent turn to Malegaon, Nanded, Amravati, Bhiwandi Morcha due to incident in Tripura, insensitivity shown by Muslim Morchakars

============================================================================================

<

Related posts

Leave a Comment