मुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटणार या संदर्भात पत्रकार परिषदा घेतल्यामुळे नेमकं काय घडलं वाचा मराठा समाजाचे (Maratha reservation) मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा (State Backward Commission report Maharashtra) अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला (Maratha aarakshan) कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी (OBC) किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं.
म्हणजेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून (OBC quota) नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल येत्या 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात (Vishesh Adhiveshan) मांडला जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. Implementation of Maratha Reservation-Sagesoyre Ordinance or independent reservation; Suspense increased, will the agitation stop or will it rage further, after the Chief Minister’s press, Jarange’s press
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका मांडली. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना आधीपासून लागू असलेलं आरक्षण लागू असेल. पण ज्यांच्याकडे कुठल्याही नोंदी नाहीत, त्यांना याआधी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जे आरक्षण दिलं होतं, तसं सर्व मराठा समाजाला (नोंदी नसलेल्यांनाही) देण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. Implementation of Maratha Reservation-Sagesoyre Ordinance or independent reservation; Suspense increased, will the agitation stop or will it rage further, after the Chief Minister’s press, Jarange’s press
मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालातील चार मोठे मुद्दे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणारओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळतं तेच मिळणारज्यांच्याकडे कोणत्याही नोंदी नाहीत, त्या सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र आरक्षण मिळणार दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरु केलं आहे. मात्र आता राज्य सरकारने ओबीसी कोट्यातून आरक्षणाऐवजी मराठा समाजाला स्वतंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसी किंवा इतर समाजाला धक्का न लागता, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांना ती ती प्रमाणपत्र देण्यात आली. सरकार सकारात्मक असताना आंदोलन करणं उचित राहणार नाही. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालातील चार मोठे मुद्दे
- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार
- ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण
- ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना आधीपासून जे आरक्षण मिळतं तेच मिळणार
- ज्यांच्याकडे कोणत्याही नोंदी नाहीत, त्या सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र आरक्षण मिळणार
मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद
मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून तात्काळ पत्रकार परिषद घेतली की आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मुंबई येथून पत्रकार परिषद घेऊन मागासवर्गीय अहवालाचा सादर झाले असल्याची घोषणा केली तसेच मराठ्यांना मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण देण्याबाबतही पत्रकार परिषदेमध्ये सांगितले कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असेही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर मनोज जडांगे उपोषण स्थळी सराटी येथून लाईव्ह आल्यानंतर सरकारवर आक्रमक भूमिका घेत आमचं आमरण उपोषण हे मराठ्यांना कुणबी आरक्षण मिळवून देण्यासाठी असून जो अध्यादेश आपण काढलेला आहे तो अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आहे त्यामुळे आपण आपल्याच अध्यादेशाबाबत गैरसमज पसरू नये ही आपल्याला नम्र विनंती असल्याचे मनोगत पाटील यांनी सांगितले Implementation of Maratha Reservation-Sagesoyre Ordinance or independent reservation; Suspense increased, will the agitation stop or will it rage further, after the Chief Minister’s press, Jarange’s press