Take action against Raza Academy for the violence
मुंबई : त्रिपुरा येथील कथित हिंसाचारानंतर महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यात दंगली उसळल्या, याप्रकरणी जातियतेचे विष पेरणाऱ्या रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालावी तसेच पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
याबाबत अतुल भातखळकर म्हणाले, मुस्लिम जातीयतेचे विष पेरणाऱ्या रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालावी. काल नांदेड, मालेगाव, आमरावती या ठिकाणी रझा अकादमीने त्रिपुरातील न घडलेल्या घटनेवरुन सर्वसामान्यांच्या घरांची तोडफोड केली, पोलिसांना जखमी केले.Take action against Raza Academy for the violence
त्यामुळे या संघटनेवर तातडीने बंदी घालावी कारण हा यांचा इतिहास राहीलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांना आठवण करुन देऊ इच्छीतो २०१२ साली रझा अकादमीने घडविलेल्या दंगलीवरही आपण तेव्हा हीच मागणी केली होती. असे अतुल भातखळकर म्हणाले.Take action against Raza Academy for the violence
भातखळकर ट्विटमध्ये म्हणाले, धार्मिक दंगली घडविणाऱ्या रजा अकादमीवर कठोर कारवाई करण्यासोबतच कायमची बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करा, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली आहे. ते ही हिंमत दाखवतील अशी अपेक्षा आहे.Take action against Raza Academy for the violence
महत्वाच्या बातम्या
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर