जालना जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले करियर गाईडंस वर्गाचे आयोजन

जालना जिल्हा परिषदेने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले करियर गाईडंस वर्गाचे आयोजन

विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची गरज असते ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी करियर गाईडंस वर्गाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. दर महिन्याच्या पंधरा तारखेला हा गाईडंस वर्ग घेणार आहे. त्यासाठी 150 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. Jalna Zilla Parishad organized a career counseling class for students preparing for the competitive examination

यात दहावी, बारावी उत्तीर्ण व पदवीधर पदवीचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी आणि उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. येत्या 15 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना स्वतः या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला दुपारी तीन ते पाच यावेळी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हे वर्ग होतील. Jalna Zilla Parishad organized a career counseling class for students preparing for the competitive examination

यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण व समुपदेशन वर्गाचा निश्चित लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परीक्षेची भीती दूर होईल. घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, ग्रामीण व शहरी भाग या कोणत्याही गोष्टींचा स्पर्धा परीक्षेच्या तयारीवर परिणाम होणार नाही. या वर्गामधून विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती होईल अभ्यास कसा करावा हे कळेल. हे मार्गदर्शन मिळाले तर स्पर्धा परीक्षा बाबत त्यांची भीती कमी होईल. वर्षा मीना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी सांगितले

<

Related posts

Leave a Comment