Fadnavis-Shinde-Pawar grand coalition government ministry allocation announced, see who got which ministerial post
Maharashtra vidhansabha elections 2024- महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये महायुतीच्या भाजप शिवसेना संजय गट व राष्ट्रवादी अजित पवार गटांना 232 जागा मिळवत मोठा बहुमत प्राप्त झालेले आहे. निवडणुकांचा निकाल लागून तब्बल एक महिना झालेले आहे. मुख्यमंत्र्यांची शपथविधी व्हायला पंधरा दिवस. मंत्री वाटपासाठी 25 दिवस तर आता त्यांना खाते वाटपासाठी महिना होताना दिसत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नाेव्हेंबरला मतदान तर २३ नाेव्हेंबरला मतमाेजणी झाली. निकालानंतर ५ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शपथ घेतली. यानंतर १५ डिसेंबरला मंत्रीमंडळाचा विस्तार झाला हाेता. अखेर आज खातेवाटप जाहीर झाले.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलले महायुती सरकारचे बहुचर्चित खातेवाटप अखेर आज (दि.२१) जाहीर झाले. गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच राहाणार आहे. तसेच ऊर्जा खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच सोपवली गेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे नगरविकास खाते तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पूर्वीचेच अर्थ खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ( Maharashtra Cabinet Portfolio)
सदरील महायुती सरकारचे बहुचर्चित खाते वाटप नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर जाहीर झाले. तिन्ही पक्षांमध्ये चांगल्या खात्यासाठी जी ओढाताण होती ती व कोणत्या पक्षाला कोणता मंत्र पद मिळाले याची प्रतीक्षा महाराष्ट्र लागली होती. आता नेमकं कोणत्या पक्षाला व कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळालं हे वाचा खालील प्रमाणे.
कोणाला कोणत खातं भेटलं पहा यादी खालील प्रमाणे-
गृह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नगर विकास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार
सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले
महसूल चंद्रशेखर बावनकुळे
उर्जा देवेंद्र फडणवीस
उद्योग उदय सामंत
माती व पाणी परीक्षण संजय राठोड
पाणीपुरवठा गुलाबराव पाटील
सार्वजनिक आरोग्य प्रकाश आबिटकर
वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ
रोजगार हमी भरत शेठ गोगावले
अन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळ
उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज चंद्रकांत पाटील
पर्यावरण पंकजा मुंडे
महिला व बालविकास अदिती तटकरे
क्रीडा दत्ता भरणे
जलसंधारण राधाकृष्ण विखे पाटील गोदावरी व कृष्णा खोरे विकास
जलसंधारण विदर्भ तापी कोकण विकास व आपत्ती व्यवस्थापन गिरीश महाजन
मत्स्य व बंदर निलेश राणे
सहकार बाबासाहेब पाटील
सामाजिक न्याय संजय शिरसाठ
कृषी माणिकराव कोकाटे
अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण धनंजय मुंडे
मदत व पुनर्वसन मकरंद पाटील
कामगार आकाश फुंडकर
वन गणेश नाईक
शालेय शिक्षण दादा भुसे
कौशल्य विकास रोजगार उद्योग संसाधन मंगल प्रभात लोढा
परिवहन प्रताप सरनाईक
विपण व प्रोटोकॉल जयकुमार रावल
ओबीसी विकास दुग्धव्यवसाय विकास ऊर्जा अतुल सावे
आदिवासी विकास अशोक उईके
पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण शंभूराजे देसाई
माहिती तंत्रज्ञान आशिष शेलार
वस्त्रोद्योग संजय सावकारे
राज्यमंत्री यादी खालील प्रमाणे
सामाजिक न्याय अल्पसंख्यांक विकास मंत्रालय वैद्यकीय शिक्षण माधुरी मिसाळ
अर्थ आणि नियोजन विधी व न्याय आशिष जयस्वाल
सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा मेघना बोर्डीकर
उच्च व तंत्र शिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन इंद्रनील नाईक
गृह राज्यमंत्री शहर योगेश कदम
गृहनिर्माण पंकज भोयर