Mukhymantri MahaArogya Skills Development Training |मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम | हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रम
Online Team | MahaArogya Skills Development Program कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, काळाची गरज ओळखून आपण हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करत आहोत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आरोग्य विभागाला सर्वाधिक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोरोना संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयीसुविधा चालवणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने आज सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असे ते म्हणाले.
ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण – MahaArogya Skills Development Program Registration 2021 “सर्वांसाठी आरोग्य” धोरणाला चालना देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य विकास प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. राज्यातील ३४८ इतकी वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालये यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले असून यामाध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल.
How To Register For Maha Arogya Kaushalya Vikas Prashikshan Program 2021 प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी.
Mukhyamantri MahaAarogya Scheme Registration 2021
या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत अल्प मुदतीचे प्रशिक्षण (Short Term Training) रोजगारासाठी आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आरोग्य क्षेत्रातील NSQF संलग्न विविध अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येते.
यामधील अभ्यासक्रमांचा प्रशिक्षण कालावधी सर्वसाधारणपणे ६०० तासांपर्यंत आहे. तद्नंतर त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन केले जाते.
यशस्वी उमेदवारांचे प्रमाणीकरण करण्यात येते. त्यानंतर यशस्वी उमेदवारांना रोजगार / स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतात.
Age Limit For Mukhyamantri Maha Aarogya Scheme 2021
कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी इच्छुक 18 ते 45 या वयोगटातील उमेदवारांना मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत कौशल्य विकासाचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण पुढील ३ महिन्यात देण्यात येईल.
कोविड-19 मुळे वैद्यकीय क्षेत्रात विविध मनुष्यबळाची निर्माण झालेली गरज लक्षात घेवून आवश्यक असलेली तंत्र कुशलता इच्छूक विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.
o————————————————————–o
- Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठी जीवित हानी ची शक्यताअहमदाबाद, १२ जून २०२५: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज दुपारी एक मोठा
- PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधि 20व्या हप्त्याची संभाव्य तारीखप्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशभरातील
- Monsoon Update| महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजपुणे, १२ जून २०२५: भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पुणे वेधशाळेच्या
- बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेटअमरावती, 11 जून 2025: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील
- मद्यप्रेमींना मोठा झटका! महाराष्ट्रात दारू महागली, दरात ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढमुंबई, ११ जून २०२५: महाराष्ट्र सरकारने दारूवरील उत्पादन शुल्क (Excise Duty)