Online Team | नांदेड दि. 19 :- आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दुर व्हावा. यासाठी जिल्ह्यात सन 2021 साठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्हयातील जास्तीतजास्त युवक-युवतींनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा.
आधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक (02462) 251674 वर संपर्क साधवा. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://forms./ubnTcxhi43Ee4PLC6 लिंक वर जाऊन आपली माहिती भरुन नाव नोंदणी करता येणार आहे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींना जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून प्रामुख्याने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, वैद्यकीय संस्था तसेच वीस पेक्षा अधिक बेडची सोय असणारी रुग्णालये या कार्यक्रमांतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून सुचिबध्द होऊन त्याद्वारे प्रशिक्षण देण्यास पात्र होऊ शकणार आहेत.
हे संपुर्ण प्रशिक्षण उमेदवारांना, लाभार्थ्यांना पुर्णपणे नि:शुल्क असुन सुचिबध्द प्रशिक्षण संस्थांना प्रशिक्षणाचे शुल्क महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत अदा करण्यात येईल, असेही प्रसिध्दीपत्रकात सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून हंगामात महाराष्ट्रात… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण घेतले… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
