The Prime Minister announced three major decisions, including the announcement of a booster dose of the corona vaccine
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी लस घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल असं पंतप्रधान म्हणाले. त्याची सुरुवात मात्र नव्या वर्षात 10 जानेवारीपासून करण्यात येईल असं मोदींनी जाहीर केलं.
कोरोनाचा नवा व्हेरीएट ओमिक्रॉनमुळ जगभरात संसर्ग वाढतोय. देशातही रुग्णसंख्या वाढते आहे. कुणीही घाबरु जायचं कारण नाही आहे. सगळ्यांना सावध राहावं, सतर्क राहावं. काळजी घ्यावी. असे त्यांनी देशातील जनतेला सांगितले आहे. तसेज देशातील कोरोनाची स्थिती आणि ओमिक्रॉनला थोपवण्याचा प्लॅनही मोदींनी सांगितला आहे. The Prime Minister announced three major decisions, including the announcement of a booster dose of the corona vaccine
ज्येष्ठांसाठीही प्री-कॉशनरी डोस! 60 वर्षांवरील ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी डोस दिला जाईल. येत्या 10 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु केलं जाईल, असं मोदींनी यावेळी म्हटलं. त्याचप्रमाणं फ्रंट लाईन आरोग्य कर्माचाऱ्यांना प्रॉकॉशनरी कोरोना लसीचा डोस दिला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. गंभीर आजारांपासून पीडित असलेल्या आणि कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी लस दिली जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 415 वर पोहोचली आहे. त्यापैकी 115 जण ओमिक्रॉनच्या संसर्गातून बरे देखील झाले आहेत. महाराष्ट्रातही (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत.
वाचा मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे –
- मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे वर्ष संपतंय. वर्ष संपण्यासोबत आता कोरोनाचा नवा व्हेरीएट ओमिक्रॉनमुळ जगभरात संसर्ग वाढतोय.
- देशातही रुग्णसंख्या वाढते आहे. कुणीही घाबरु जायचं कारण नाही आहे.
- सगळ्यांनी सावध राहावं, सतर्क राहावं. काळजी घ्यावी. हात धुवत राहायला विसरायचं नाही आहे.
- व्हायरस म्युटेट होत असल्यामुळे आपल्याला कोरोनाशी लढण्याची ताकदही वाढते आहे. त्यातही गुणाकार होतो आहे.
- देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत. ५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत. १ लाख ४० हजार आयसीयू बेड्स आहेत.
- देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत ४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत.
- राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत. चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
- लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचं काम करत आहे. लसीकरणात भारतानं मैलाचा दगड पार केलाय.
- पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य असलेल्या गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे.
- लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार आहे.
- कोरोना अजूनही गेलेला नाही. सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, देशातील नागरीकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही अविरतपणे काम करत आहोत.
- सध्या ओमिक्रॉनची चर्चा जोरात सुरु आहे. याबाबतचे अनुमानही वेगवेगळे आहे. ओमिक्रॉनवर देशातील वैज्ञानिकही बारकाईनं नजर ठेवून आहेत. याचा अभ्यास करत आहेत. आता जे अध्ययन देशातील संशोधकांनी केलं आहे, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात आले आहेत.
======================================
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेत
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 72 मंत्र्यांसह, मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे | Modi 3.0 With 72 Ministers Takes Oath, 9 New Faces In Cabinet