जलील, ओवैसी यांच्या औरंगजेब प्रेमावर महाराष्ट्रात संताप; बाप,भावाची हत्या करणारा क्रूरकर्मा औरंगजेब कुणाचाही आदर्श होऊ शकत नाही.

जलील, ओवैसी यांच्या औरंगजेब प्रेमावर महाराष्ट्रात संताप; बाप,भावाची हत्या करणारा क्रूरकर्मा औरंगजेब  कुणाचाही आदर्श होऊ शकत नाही.

औरंगाबाद : राज्यात एमआयमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) आले आणि पुन्हा नवा वाद पेटला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अकबरुद्दीन ओवैसी एका शाळेच्या उद्घाटनाला औरंगाबादेत येत असल्याचे जलील यांनी सांगितले. मात्र त्यांनी शाळेच्या उद्घाटनाबरोबरच औरंगाबादेतल्या मशीदींनाही बेट दिली आणि फुलं वाहिली, चादर चढवली. मात्र ते तेवढं करून थांबली नाही तर थेट औरंगाबादेतल्या औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangjeb kabar) पोहोचले आणि तिथ जाऊन त्यांनी चादर चढवली. त्यामुळे आता पुन्हा राजकीय घमासान सुरू झालं आहे. या कृतिवरून इम्तियाज जलील आणि अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर सडकून टीका होत आहे. सुरूवातील याचा समाचार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांनी मुलाचं नाव औरंगजेब का ठेवलं नाही? म्हणत या घटनेचा समाचार घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीची धडाडणारी तोफ खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनीही यावरून खोचक सवाल विचारले आहेत.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

मला आत्ता समजलं हैदराबादचे एक महाशय औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आले. हे अतिशय दुर्दैवी आहे. ज्या औरंजेबाने स्वतःच्या वडिलांना हाल हाल करून मारलं. त्याचं उदात्तीकरण कश्यासाठी..? असा सवाल आता खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. त्यामुळे आता यावर आणखीही राजकीय प्रतिक्रिया उमटणार हे निश्चत झालं आहे. दुपारी चंद्रकांत खैरे यांनीही यावरून खरपूस समाचार घेतला होता. हा बाहेरील नेता चर्चेच राहायला इथे आला आहे. हे लोक हिंदू -मुस्लिम संघर्ष पेटवण्याचे काम करत आहेत. मात्र आता शिवसेनाही गप्प बसणार नाही, आम्ही लोकांना यांची खेळू समाजावून सांगणार आहे. असे ते म्हणाले होते.

हिंदुंची मंदिरं उध्वस्त करणाऱ्या, संत परंपरेत खंड पाडणाऱ्या औरंगजेबासमोर हे कसे नतमस्तक होऊ शकतात, असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे. कोणत्याही मुस्लिम बांधवांच्या घरात औरंगजेबाला पूजलं जात नाही, कोणतेही मुस्लिम औरंगजेबाचं नाव आपल्या मुलाला देत नाही, याचं कारणच हे आहे, असं खैरे म्हणाले. खुद्द एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही यापूर्वी आपण औरंगजेबाच्या कबरीसमोर कधीही गुडघे टेकले नाहीत, असं म्हटलं होतं.

मात्र आज खासदार जलील यांनी थेट औरंगजेबाच्या कबरीवरच फुलं वाहिली. खा. जलील यांच्या या कृतीमुळे भाजप, शिवसेनेकडून तसेच सामान्य नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याचं कारणंही तसंच आहे. इतिहासात डोकावून पाहिलं तर औरंगजेब बादशहा किती क्रूर आणि किळसवाणा होता, याचा प्रत्यय येतो. साम्राज्याची गादी हडपण्यासाठी सख्ख्या भावाचं शीर धडावेगळं करण्याच्या या पाशवी रक्तापुढं नतमस्तक होण्याची हिंमतच कशी होते, असा प्रश्न विचारला जात आहे. Anger in Maharashtra over Aurangzeb’s love for Jalil, Akbaruddin Owaisi; Aurangzeb, the brutal Karma who killed his father and brother, cannot be anyone’s role model.

‘स्वतःच्या भावाचं शीर धडावेगळं केलं अन् ते धुवूनही पाहिलं’

औरंगजेब किती क्रूर होता, याचे अनेक किस्से इतिहासात सापडतील. मात्र स्वतःच्या भावाशी तो ज्या प्रकारे वागला तो अत्यंत क्रूर आणि किळसवाणा प्रकार आहे. 30 ऑगस्ट 1659 रोजी औरंगजेबानं स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाचा म्हणजेच दारा शुकोहचा क्रूरपणे खून केला आणि तो शहाजहानच्या साम्राज्याचा बादशाह झाला. शहाजहानची चार मुलं. दारा, शाहशुजा, औरंगजेब आणि मुराद बख्श. शहाजहान 67 व्या वर्षी आजारी पडला तेव्हा आता शहाजहानच्या साम्राज्याचा वारसा मोठा मुलगा दारा शुकोहकडे येणार हे निश्चित होतं. पण औरंगजेबला हे पटत नव्हतं. उर्वरीत दोन भावांचा प्रश्नच नव्हता. शहाजहान आजारी पडला तेव्हा दारानं इतर तिन्ही भावांना कळवलं नाही. अखेर तिन्ही भावंड दाराच्या विरोधात चाल करून आले. तगडं सैन्यदल असूनही दारा औरंगजेबसमोर हारला. युद्धातून तो फरार झाला. Anger in Maharashtra over Aurangzeb’s love for Jalil, Akbaruddin Owaisi; Aurangzeb, the brutal Karma who killed his father and brother, cannot be anyone’s role model.

पण त्याच्या पाळतीवर असलेल्या औरंगजेबानं त्याला अखेर शोधून काढलं. दिल्लीत अत्यंत दैन्यावस्था करत दाराची धिंड काढण्यात आली. 30 ऑगस्ट 1659 रोजी दाराचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. असं सांगतात की, दाराचं कापलेलं शीर घेऊन सैनिक औरंगजेबकडे गेला. ते सगळं रक्तानं माखलेलं होतं. औरंगजेबानं दाराचं मुंडकं एका थाळीत ठेवायला लावलं. त्याला धुवून घ्यायला लावलं. तो दाराच आहे का, याची खआत्री केली. ते दाराचंच शीर असल्याची खात्री पटल्यावर तो धाय मोकलून रडला. औरंगजेब एवढ्यावरच थांबला नाही तर दाराच्या प्रेताची पुन्हा एकदा हत्तीवर धिंड काढून विटंबना करण्यात आली. शेवटी हुमायूनच्या कबरीशेजारी त्याला दफन करण्यात आलं. दाराची हत्या करणाऱ्यांनाही औरंगजेबानं आधी बक्षीसी दिला आणि नंतर त्यांचीही हत्या केली. (जादुनाथ सरकार यांच्या औरंगजेब या पुस्तकातील हे संदर्भ आहेत)..

Anger in Maharashtra over Aurangzeb’s love for Jalil, Akbaruddin Owaisi; Aurangzeb, the brutal Karma who killed his father and brother, cannot be anyone’s role model.

महत्वाच्या बातम्या-

<

Related posts

Leave a Comment