जुन महिन्यात राज्यसभेच्या सहा जागेपैकी एक एक जागा राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि सेना लढवणार दोन जागा भाजपा लढवणार म्हणजे खात्रीशीर निवडून येण्यासाठी जी 42 मते लागतात ती यांचा कडे आहेत. आता सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष थांबनार आहेत.या साठी राष्ट्रवादी ने त्यांना आपला पाठिंबा दिला आहे ,पण या जागेसाठी सेना आग्रही आहे. त्यांना पण ही जागा हवी आहे. सहाव्या जागे साठी मविआ कडे इतके मत आहेत ज्याने ती जागा सेना लढवू पण शकते आणि जिंकू पण शकते..मविआ कडे चार जागा जिंकू शकेल इतकी मत पण आहेत. Rajya Sabha elections: Is the path to Rajya Sabha difficult for Sambhaji Raje?
सेनेला जर मविआ ने मदत केली तर ही सहावी जागा पण निवडून येऊ शकते पण इकडं राष्ट्रवादीने राजेंना पाठिंबा दिलाय. सध्या राज्यात मविआ चे १६९ आमदार आहेत त्यात एक सेनेचे आमदार रमेश लटके हयात नाहीत त्यामुळे ही संख्या १६८ आहे.शिवसेना ५५राष्ट्रवादी ५४काँग्रेस ४४ इतर ८ आणि अपक्ष ८ असे १६८भाजप कडे १०६ आमदार आहेत आणि बाकी जनसुराज्य १ ,रासप १ आणि अपक्ष ६ असे ११३ आमदार आहेत .सहज २ जागा निवडून आणू शकतात उलट त्यांची काही मत शिल्लक आहेत. आता भाजपा छत्रपती राजे ना समर्थन देणार की आपला उमेदवार देणार हे पाहणे गरजेचे आहे. Rajya Sabha elections: Is the path to Rajya Sabha difficult for Sambhaji Raje?
पवारसाहेबांनी पाठिंबा तर दिलाय पण सेनेची आणि भाजपाची गोची झालीय, काँग्रेसला फक्त अतिरिक्त 2 मते आहेत त्यांना जास्त लोड नसणार आहे.हाय वरातीत तर हाय अशी गत आहे.भाजप ने पाठिंबा दिला तर ते दोन जागा वर गप बसतील.आणि सेनेला पाठिंबा नाही तर राजे निवडून येतील. गेल्या वेळी पेशवे हे राज्यांना सत्ता देतात अस वादळ उठल होता ,आता साहेब निवडणूकची सुकर वाट करून देतात की कात्रज चा घाट दाखवतात हे पाहणे गरजेचे आहे. Rajya Sabha elections: Is the path to Rajya Sabha difficult for Sambhaji Raje?
शिवसेनेकडून या जागेवर उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून जर पाठिंबा मिळाला नाही तर संभाजी राजे छत्रपती यांचा राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग खडतर होऊ शकतो. याची काय कारणं आहेत यासंदर्भातला हा आढावा. Rajya Sabha elections: Is the path to Rajya Sabha difficult for Sambhaji Raje?
मतांची गणितं काय आहेत?
आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपला 2, शिवसेनेला 1, कॉंग्रेसला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 अशा जागा मिळू शकतात. राज्यसभेसाठी निवडून येण्यासाठी 41 आमदारांच्या मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे 27 मतं अतिरिक्त आहेत तर भाजपकडे 22 मतं बाकी राहतात. त्यामुळे सर्वपक्षीय आमदारांच्या उरलेल्या संख्याबळाने जर संभाजी राजेंना पाठिंबा दिला तर संभाजी राजे निवडून येऊ शकतात.
तसं आवाहन संभाजी राजे छत्रपती यांनी यापूर्वी केलं आहे. 12 मे रोजी संभाजी राजेंनी ‘स्वराज्य’ नावाच्या संघटनेची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यसभेची निवडणूक ही अपक्ष लढणार असून सर्वपक्षीय आमदारांनी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. या पाठिंब्यासाठी त्यांनी सर्व आमदारांना खुलं पत्र लिहून आवाहन केले आहे. महाविकास आघाडीची मतं संभाजीराजेंसाठी निर्णायक ठरणार आहेत. पण शिवसेना यासाठी तयार नसल्याचं दिसतंय.
शिवसेना सहावी जागा लढणार…!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना संभाजी राजेंना पाठिंबा देण्याविषयी विचारलं असता ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाचा 1 खासदार निवडून येऊ शकतो. अधिकची मतं ही प्रत्येक पक्षाकडे राहतात. त्या मतांबाबत आमची इतर पक्षाची अद्याप चर्चा झालेली नाही. आमच्या सहकारी पक्ष कॉंग्रेसला जर मतांची गरज भासली तर आम्ही त्यांनाही मदत करू” शरद पवारांनी संभाजी राजे यांच्या पाठिंब्यावर थेट बोलणं टाळलं असलं तरी संभाजी राजेंच्या कार्यालयातून शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात आलं.
Rajya Sabha elections: Is the path to Rajya Sabha difficult for Sambhaji Raje?
हे ही वाचा ======
- कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography
- Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे?
- सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर?
- मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ
- Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर