राज ठाकरेंना उत्तर भारतातुन विरोध वाढला या १० राज्यांनी ही घातली प्रवेशांवर बंदी

राज ठाकरेंना उत्तर भारतातुन विरोध वाढला या १० राज्यांनी ही घातली प्रवेशांवर बंदी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. पण या दौऱ्याला एक भाजप खासदार विरोध करताना दिसून येत आहे. या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. अयोध्येत येण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर त्यांनी इथे यावे, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे. (10 states ban raj thackeray)राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्याला महाराष्ट्र भाजपनेही पाठिंबा दिला आहे. पण उत्तर प्रदेशातल्या भाजप खासदारानेच याला विरोध केल्यामुळे हा दौरा चर्चेत आला आहे. अशात हा वाद आता आणखीनच वाढल्याचे दिसत आहे.

खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंना विरोध केल्यानंतर आता आणखी काही उत्तर भारतातील राज्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकेच नाही, तर १० राज्यांनी राज ठाकरेंवर बंदी सुद्धा घातली आहे. त्या सर्व राज्यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

उत्तर प्रदेश राज्यातून राज ठाकरेंना विरोध होत आहे. असे असतानाच आता हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि उत्तराखंड अशा ९ राज्यांनी राज ठाकरेंच्या प्रवेशाला बंदी घातली आहे. या सर्व राज्यांनी राज ठाकरे माफी मागा अन्यथा राज्यांत पाऊल ठेऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच ब्रिजभूषण सिंग हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये राज ठाकरेंविरोधात प्रचार करताना दिसून येत आहे. ५ लाख उत्तर भारतीय राज ठाकरेंना विरोध करायला येतील. माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश देणार नाही, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे.

तसेच माझा महाराष्ट्राला विरोध नाहीये. पण आमच्या लोकांना मनसेने खुप मारले आहे. मी त्याचा विरोध करत आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंना माफी मागितल्याशिवाय इथे येऊ देणार नाही, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंना आपण विमानतळावरच थांबवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

<

Related posts

Leave a Comment