SSC,HSC 10th, 12th Examination Results 2022 maharesult.nic.in | बारावीचा 10 तर, दहावीचा निकाल 20 जूनला; बोर्डाची माहिती

Maharashtra SSC, HSC Result 2022 Soon at mahresult.nic.in, Know How to Check MSBSHSE 10th, 12th Result

पुणे : 10 वी, 12 वीच्या परीक्षेचा निकाल (SSC, HSC Results) लवकरच लागणार असून या परीक्षेची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत तर, बारावीचा 10 जूनला लागणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी, 12 वीच्या) परीक्षा सन २०२२ साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण गतवर्षी http://result.mh-ssc.ac.in aharashtra SSC, HSC Result 2022 Soon at http://mahresult.nic.in Know How to Check MSBSHSE 10th, 12th Result या संकेतस्थळवर उपलब्ध झाले होते. सकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकतील व त्याची प्रत (प्रिंट) घेता येईल. यावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर केले जातात, यंदा दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.

तसेच कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासता ते परत केले होते. यामुळे या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात हेाती. मात्र राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरूळीत सुरू होते.

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या पेपर तपासणीचे कामकाज राज्यात सुरळीत सुरू आहे. कमी विद्यार्थी संख्या असलेल्या काही विषयांच्या पेपर तपासणीचे काम हे अंतिम टप्प्यावर पोचले आहे. इतरही पेपर तपासणी ही वेगाने सुरू असल्याने दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता; तर कायम विनाअनुदानित शाळा संघटनेच्या असंख्य प्रतिनिधींनी दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासता ते परत केले होते.

दहावीला १६ लाख
दहावीच्या परीक्षेला यंदा १५ मार्चपासून सुरुवात झाली होती. या परीक्षेला राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतून पाच हजार ५० मुख्य आणि १६ हजार ३३५ उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला तब्बल १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी बसले होते.


बारावीला १४ लाख
बारावीची परीक्षा ही ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. त्या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बसले होते, यात मुंबई विभागातील तीन लाख ३५ हजार २० विद्यार्थ्यांचा समावेश होता.

हे ही वाचा ====

<

Related posts

Leave a Comment