ढगाळ वातावरणाचा अंदाज 

ढगाळ वातावरणाचा अंदाज 
पुणे : मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याने राज्यातील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. येत्या काही दिवसांत वातावरणात झपाट्याने बदल होणार आहेत. त्यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. रविवारी (ता.२३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी हा चटका चांगलाच जाणवत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. मात्र, दुपारनंतर अचानक भरून येत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत. त्यामुळे कमाल तापमान कमीअधिक होत आहे.
मध्यरात्रीनंतर हवेत काहीसा गारवा तयार होत असल्याने तुरळक ठिकाणी कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.

सध्या मध्य महाराष्ट्रातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे. या भागात २६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. कोकणात अलिबाग वगळता सर्वच भागांत कमाल तापमान सरासरीएवढे होते. मराठवाड्यातही उन्हाचा चटका कमी झाल्याने कमाल तापमान ३७ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. विदर्भातील बहुतांशी भागात कमाल तापमानात चढउतार होत आहे. त्यामुळे या भागांत पुन्हा ४१ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. विदर्भात ३९ ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते.

राज्यात या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्वमोसमी पाऊस
सोमवार ः
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक
मंगळवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, संपूर्ण मराठवाडा
बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा
गुरुवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा

रविवारी (ता.२३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३४
  • अलिबाग ३४.२
  • रत्नागिरी ३३
  • डहाणू ३४
  • पुणे ३३.७
  • जळगाव ३९
  • कोल्हापूर ३१.७
  • महाबळेश्‍वर २६.७
  • मालेगाव ४०.४
  • नाशिक ३४.३
  • सांगली ३२.६
  • सातारा ३२.१
  • सोलापूर ३८
  • उस्मानाबाद ३७.७
  • औरंगाबाद ३८.६
  • परभणी ४१
  • अकोला ४०.९
  • अमरावती ३९
  • बुलडाणा ३९
  • ब्रह्मपुरी ४१.९
  • चंद्रपूर ४१.८
  • गोंदिया ३९.६
  • नागपूर ४०.९
<

Related posts

Leave a Comment