health benefits of Jmbhul (purple fruit). आपल्या मिळणाऱ्या प्रत्येक सिझनल फळ (Fruit) मध्ये आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खासकरून उन्हाळ्यातील आंब्याचे सिझन संपत आले की, करवंद आणी जांबळाचे सिझन सुरू होते. आपल्याकडे रानावनात मिळणाऱ्या फळांना रानमेवा असेही म्हणतात. आज जाणून घेऊया खास जांभूळ फळाचे अनेक फायदे. मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळणाऱ्या जांभूळ फळाचे शास्त्रीय नाव मसायझिजियम क्युमिनीफ असे आहे. जांभळ्या रंगाच्या या फळाची चव गोड-तुरट असते. उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. जांभळाचा मोसम अतिशय कमी दिवसांचा असतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे…
Read MoreTag: Marathi Agri News
सोयाबीनचे ९३ हजार हेक्टरवर पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन
Online Team:- राज्यात यंदा (२०२१-२२) राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान्य) ९३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन आहे. त्यासाठी ६८ हजार ६२५ क्विंटल प्रमाणित बियाण्याची गरज आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत १० वर्षांआतील वाणांचे सोयाबीन पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येतात. त्याव्यतिरिक्त १५ वर्षांपर्यंतच्या वाणांचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वितरित करण्यात येते. या अभियानांतर्गत २०२१-२२ साठीच्या नियोजित वार्षिक कृती आराखड्यानुसार त्यासाठी अनुक्रमे २६ हजार ६२५ क्विंटल आणि ४२ हजार क्विंटल प्रमाणित सोयाबीन बियाण्याची गरज असणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान) १० वर्षांआतील सोयाबीन वाणांचे सलग पीक प्रात्यक्षिकांचे २७ हजार ५०० हेक्टरवर नियोजन…
Read Moreढगाळ वातावरणाचा अंदाज
पुणे : मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याने राज्यातील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. येत्या काही दिवसांत वातावरणात झपाट्याने बदल होणार आहेत. त्यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. रविवारी (ता.२३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी हा चटका चांगलाच जाणवत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. मात्र, दुपारनंतर अचानक भरून येत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत. त्यामुळे…
Read More