निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कार्य कर्तृत्त्ववाच्या पाठीशी असलेले महाराष्ट्रातील अनेक नामवंत पर्यावरणतज्ज्ञ यांचा नेहमीच मोलाचे सल्ला मार्गदर्शन असते. तसेच अनेक कार्याबाबत स्वतः सहभाग असतो. यावर्षीचे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन शिर्डी येथे ५०० पर्यावरणप्रेमी सदस्यांच्या उपस्थिततीत 28,29,30 ऑक्टोबर रोजी पार पडले. या संमेलनाचा लेखाजोखा कार्य अहवाल अनेक पर्यावरणतज्ज्ञ समोर प्रत्यक्ष भेट घेऊन मांडण्यात आला.
जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सरांची नुकतीच आम्ही पुण्यात कृतज्ञता भेट घेतली. शिर्डी येथे दिवाळीत संपन्न झालेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या पर्यावरण संमेलनात प्रसिद्ध झालेल्या ‘वनश्री’ विशेषांकासाठी सरांनी ‘संतप्त धरित्री’ हा विशेष लेख दिला होता. तसेच अलिकडे त्यांनी वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करण्याबाबत मत व्यक्त केले होते.
गाडगीळ सरांचे ते परखड मत वाचून पर्यावरण प्रेमींच्या भुवया उंचावल्या होत्या. सरांची यामागची भूमिका समजून घेणे, मंडळाच्या पर्यावरण जनजागृतीच्या कामासंदर्भात संवाद साधणे हा या भेटीचा उद्देश होता. भारतीय संविधानातील चौकटींचा आधार घेऊन कृतियुक्त पर्यावरणीय जनजागृती व्हायला हवी आहे. संविधानानुसार पर्यावरण क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायच्या चांगल्या संधी असून शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी कृतियुक्त जागृतीवर भर द्यायला हवा अशी भूमिका गाडगीळ सरांनी मांडली. या भेटीवेळी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, सल्लागार-समन्वयक आणि ‘चांगुलपणाची चळवळ’चे संस्थापक राजजी देशमुख, मंडळाचे कार्यक्रम नियोजन सचिव सुभाष वाखारे, पुण्याचे पर्यावरणप्रेमी आदित्य कुंटे उपस्थित होते