PFI supporters raised slogans of Pakistan Zindabad in Pune
पुणे : देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर या संघटनेचे समर्थक ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत. दरम्यान, शुक्रवारी महाराष्ट्रातील पुण्यात झालेल्या निदर्शनेदरम्यान ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने या घटनेचे खंडन केले असून, व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करण्यात येत आहे. (PFI supporters raised slogans of Pakistan Zindabad in Pune: protest was being held at collector’s office in protest against NIA raids)
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे सध्या देशभरात चांगलीच चर्चेत आली आहे. गुरुवारी एनआयएने देशभरात सर्वत्र छापे टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात हे 10 छापे टाकण्यात आले. ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘अल्ला हूं अकबर’ अशा घोषणांचे व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काल पीएफआय संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनातील हे व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी रात्री 15 राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या 93 ठिकाणांवर छापे टाकले. टेरर फंडिंग प्रकरणी करण्यात येत असलेल्या या कारवाईत पीएफआयच्या 106 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अटक करण्यात आलेल्यांमध्ये संघटनेचे प्रमुख ओमा सलाम यांचाही समावेश आहे. NIA सूत्रांनी सांगितले- 5 प्रकरणांमध्ये 45 जणांना अटक करण्यात आली आहे. हे पीएफआय नेते, कॅडर दहशतवाद आणि दहशतवादी कारवायांसाठी पैसे देणारे, शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देणारे लोक आहेत. हे लोकांना बंदी घातलेल्या संघटनांमध्ये सामील होण्यासाठी कट्टरपंथी बनवायचे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकाने पुणे येथील पीएफआयच्या कार्यालयावर छापा टाकला. यादरम्यान पीएफआय समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले. यावेळी तेथे उपस्थित काही कार्यकर्त्यांनी देशविरोधी घोषणाबाजी सुरू केली.
पोलिसांनी अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. आंदोलनावर तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच परवानगीशिवाय निदर्शने केल्याप्रकरणी 60-70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुख्य आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव रियाझ सय्यद असे आहे.
Read This News —
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेत
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 72 मंत्र्यांसह, मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे | Modi 3.0 With 72 Ministers Takes Oath, 9 New Faces In Cabinet