मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं. काही दिवसांतच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं. मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक विद्यार्थी, महिला, वृद्ध गंभीर जखमी झाले. या सगळ्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेत… त्यांची नेमकी ओळख काय? त्यांची पार्श्वभूमी काय? मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी कसं योगदान दिलंय? याबद्दल घेतलेला आढावा… Who is Manoj Jarange Patil who is on hunger strike for Maratha reservation and who is currently in discussion all over Maharashtra.
मनोज जरांगे पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी. मोतोरी हे त्यांचे गाव. काही वर्षांपूर्वी त्यांनी बीडमधून जालनाकडे आपला मुक्कम हलवला. जालना जवळ असलेल्या अंबडमधील अंकुशनगरात ते स्थायिक झाले. त्यांच्या घरची परिस्थिती सामान्य होती. त्यामुळे उपजिविकेसाठी त्यांनी एकेकाळी हॉटेलमध्ये काम केले. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ते समाजात जाऊ लागले. चर्चा करु लागले. मग मराठा आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी स्वत:च्या जमीन विकली. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कित्येक मोर्चे काढले. आमरण उपोषणे केली. रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण मराठवाड्यात पसरले.
गेल्या चार वर्षांपासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेत. त्याला कारण ठरलंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण शांततेत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक विद्यार्थी, महिला, वृद्ध गंभीर जखमी झाले. या सगळ्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आले
मनोज यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम केलं. पण पुढे त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापन केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरूवात केली. अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं. मनोज यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम केलं. पण पुढे त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापन केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरूवात केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता.
आंदोलने करणे हा मनोज यांचा स्थायीभाव… २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं. शिवाय सहा दिवस उपोषणही केलं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली. मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी ३५ हून अधिक मोर्चे, आंदोलने केली. Who is Manoj Jarange Patil who is on hunger strike for Maratha reservation and who is currently in discussion all over Maharashtra.