मण्यार ( COMMON KRAIT ) ओळख एका अत्यंत विषारी सापाची. नागापेक्षा 15 पटीने जहाल विषारी, अशियाखंडातला सर्वात विषारी साप.

मण्यार ( COMMON KRAIT ) ओळख एका अत्यंत विषारी सापाची. नागापेक्षा 15 पटीने जहाल विषारी, अशियाखंडातला सर्वात विषारी साप.

COMMON KRAIT Identification of a very poisonous snake. 15 times more venomous than a cobra, the most venomous snake in Asia.

हा साप माणसाला चावण्याच्या घटना वाढत आहेत. परभणीत 16 व 17 जून 2017 तारखेला दोन जणांना याने दंश केला. दोघेही कोमात. सहसा रात्री वावरणारा मण्यार मुख्यत्वे निशाचर ( Night Rider) आहे. हा काळ्या निळसर जांभळ्या किंवा गडद तपकिरी रंगाचा साप. डोके गडद काळे असते. अंगावर पांढरे जोडीदार पट्टे, ते खालच्या बाजूस A आकाराचे झालेले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. मण्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते. अन्नाच्या व थंडाव्याच्या शोधार्थ आल्यामुळे हा साप माणसांच्या घरांत सापडण्याच्या घटना घडतात.

हा असा ओळखा

याचे पोट व ओठ पांढरे असून शेपूट अखुड असते.लांबी सरासरी 3 फूट 3″ ते जास्तीत जास्त 5 फूट 9″ पर्यंत असू शकते. हा साप जुनी व पडकी घरे, शेत, बाग, विटा, दगड व ओलसर जागी आढळतो. याचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाली, सरडे, इतर छोटे साप व बेडूक इत्यादी आहे.


घरात आल्यास रात्री अंथरूणात घुसतो व माणसाच्या गर्मीला झोपतो. जरीशीही हालचाल झाली आणि याला धक्का लागला की हा कडकडून दंश करतो. कधी कधी हा चावल्याचे कळतही नाही. याचा दंश मुख्यतः पाठीवर,मानेवर,किंवा इतर ठिकाणी होतो.
चावल्यावर प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होतो. त्वरीत इलाज नाही मिळाला तर रूग्ण दगावूही शकतो.अशी लक्षणे अढळल्यास त्वरीत जिल्हा रुग्णालयात दाखल करावे..


जमिनीवर झोपत असाल तर भिंतीपासून व ओलसर जागेपासून लांब झोपा. आजुबाजूला नियमित स्वच्छता ठेवा. अंथरूण रोज झटकूनच अंथरा…
घरा समोर विटा, पडके सामान ठेवलेले असेल तर ते स्वच्छ करा….व या सापाला दुर ठेवा….
घाबरू नका काळजी घ्या.!
आणि जर घरात दिसलाच तर त्वरीत सर्पमित्रांना बोलवा.

महाराष्ट्रातील पहीले
सर्पमित्र app बनवले आहे,
संपूर्ण महाराष्ट्रातील
सर्पमित्रांचे मो.नंबर
या app मध्ये आहेत.
आणि सापांची माहीती पण उपलब्ध आहे.
कृपया हा app आपल्या मोबाईल मध्ये
Install करुन सर्पमित्राशी संपर्क करा
App download साठी पुढे लिंक वर click करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.greenworld.snakefriend

रणजित कारेगांवकर. परभणी.
जन हितार्थ,

वन्यजीवसंवर्धनसंस्था_महाराष्ट्र.

<

Related posts

Leave a Comment