नरेंद्र पाटलांनी हातावर गोंदलं ‘देवेंद्र’ नाव; म्हणाले, “छातीवर गोंदवणार होतो, पण…”

नरेंद्र पाटलांनी हातावर गोंदलं ‘देवेंद्र’ नाव; म्हणाले, “छातीवर गोंदवणार होतो, पण…”

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील सध्या आपल्या टॅटूमुळे चर्चेत आहेत. नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर चक्क राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू काढला आहे. ‘देवेंद्र’ असा टॅटू आपल्या मनगटावर काढला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देत असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. (Narendra Patil has a tattoo name of Devendra on his hand)

“आमच्या ह्रदयात, ओठावर देवेंद्र आहेत. फक्त अधिकृतपणे आता टॅटू काढला आहे. त्यामुळे ज्याच्या हातावर आणि ओठावर देवेंद्र आहे त्याने हातावर काढला आहे. एक आठवडा आधी पाटणच्या दौऱ्यावर असताना मी हा टॅटू काढला,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. “मी तर आधी ह्रदयावर काढणार होतो. पण म्हटलं आधी हातावर किती वेदना होतात ते सहन करु आणि वेळ आली तर ह्रदयावर काढू,” असंही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधानांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांशी ते संपर्कात असतात. पाटण दौऱ्यात ते पूरग्रस्तांसोबत मांडीला मांडी लावून जेवायला बसले होते. देशपातळीवरचा नेता एका सामान्य पूरग्रस्तासोबत मांडीला मांडी लावून तो जे खातोय तेच खात आहे हे पाहून माझं मन भरलं. यापेक्षा दुसरा कोणता मोठा नेता आहे असं मला वाटलं”.

“महाराष्ट्रात राज्याचा प्रमुख महत्वाचा मानला जातो. आमच्या कामगार चळवळीत गेले १५ ते २० वर्ष माथाडी कामगारांना आपलं समजणारा योग्य मुख्यमंत्री मिळालाच नाही. २०१६ रोजी सर्वात प्रथम फडणवीसांकडे माथाडी कामगारांचे प्रश्न मांडले तेव्हा खूप आत्मियता, जिव्हाळा निर्माण झाला. त्यांनी प्राथमिकतेने ते प्रश्न सोडवले. मराठा आरक्षणातही फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे. मराठा नसतानाही मराठा समाजातील गरिबांसाठी स्नेह, प्रेम हे पाहिल्यानंतर महाराष्ट्राला हे नेतृत्व १०-१५ वर्षांपूर्वी मिळालं असतं तर नक्कीच मराठा समाजाला न्याय मिळाला असता,” असं नरेंद्र पाटील म्हणाले आहेत. (Narendra Patil has a tattoo name of Devendra on his hand)

==========================================================================================================

<

Related posts

Leave a Comment