मराठा आरक्षण

मराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर शिवसेना खासदार पंतप्रधानांना भेटणार

नवी दिल्ली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली. आम्हाला अभ्यास शिकवू नका. आधी मराठ्यांना आरक्षण द्या. मग आम्हाला शिकवा, असा हल्ला चढवतानाच मराठा आरक्षणावर आम्ही रावसाहेब दानवेंचं कोचिंग करू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. (Shiv Sena MP will meet the Prime Minister on 11 Points With Maratha reservation raised by Chief Minister Uddhav Thackeray)


संजय राऊत यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची आज बैठक पार पडली. यावेळी राऊत यांनी मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्रातील काही प्रश्न आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत आले होते. त्यांनी पंतप्रधानांना 11 मागण्यांचं निवेदन दिलं आहे. त्यातील अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातील आहेत. काही सामाजिक प्रश्न आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहेत. रेल्वे मेट्रो, जीएसटी परतावा, पीक विमा प्रश्न आहे. या सर्व विषयांना चालना देण्यासाठी खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या 11 मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असं राऊत म्हणाले.

Shiv Sena MP will meet the Prime Minister on 11 Points With Maratha reservation raised by Chief Minister Uddhav Thackeray

मराठा आरक्षणासाठी स्थगन प्रस्ताव
खासदार विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. तो स्विकारला जावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्विकारावा. मग आमचा अभ्यास किती दांडगा आहे ते पाहावं, असं आव्हानच त्यांनी दानवेंना दिलं.
खासदारांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्या त्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून पाठपुरावा करण्यासाठी ही बैठक झाली. आता या 11 मागण्यांवर आम्ही पुढील आठवड्यापासून पाठपुरावा करणार आहोत, असं राऊत म्हणाले.

पंतप्रमराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर शिवसेना खासदार पंतप्रधानांना भेटणार
मराठा आरक्षणाापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या 11 प्रश्नावर आम्हाला पंतप्रधानांना भेटायचं आहे. पंतप्रधानांची आम्ही वेळ मागत आहोत. वेळ मिळताच पंतप्रधानांना भेटून आमच्या मागण्या सादर करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. (Shiv Sena MP will meet the Prime Minister on 11 Points With Maratha reservation raised by Chief Minister Uddhav Thackeray)

News Maharashtra Voice – न्युज महाराष्ट्र व्हाईस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 88
  • Today's page views: : 88
  • Total visitors : 505,612
  • Total page views: 532,393
Site Statistics
  • Today's visitors: 88
  • Today's page views: : 88
  • Total visitors : 505,612
  • Total page views: 532,393
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice