मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काल कोल्हापुरात पहिलं मूक आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बैठकीसाठी बोलावलं होतं. आज संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपतींनी पत्रकार परिषद घेतली आहे. हे आंदोलन मागे घेणार नाही पण सरकारशी चर्चा सुरुच राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते.
Maratha Reservation 6 main demands from Sambhaji Raje and Sakal Maratha Samaj to CM Uddhav Thackeray and other Ministers
काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले की, आज मुख्यमंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांच्यासमोर सहा प्रमुख मागण्या पुढे ठेवल्या होत्या. त्यासाठी काल आम्ही कोल्हापूरात मूक आंदोलन केलं होतं ज्याची सरकारने ताबडतोब दखल घेतली आणि आज बैठक घेतली. बैठकीत सारथीच्या मुद्यावर दीड तास चर्चा झाली. सरकारने सकारात्मक संवाद केला.
बैठकीत घेतलेले निर्णय
- मूक आंदोलन मागे घेणार नाही; सरकारशी चर्चा सुरुच राहिल
- येत्या गुरुवारी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी सरकारकडून तत्त्वत: मान्यता
- वसतीगृहाच्या मुद्यांबाबत 36 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांमधल्या वसतीगृहांसाठी सरकारकडून पैसे देण्यास मान्यता
- शनिवारी सारथीबाबत अजित पवार बैठक घेणार
- अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज उपलब्ध करुन देण्यातल्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन
- सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये समन्वयक समिती स्थापन करणार
—- हे ही वाचा —-
- पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यूधनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी सायंकाळी साखरपुड्याच्या… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
- शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेतलातूर, १८ मे २०२६: नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध केमिस्ट्री शिक्षक… Read more: शिवराज मोटेगावकर (RCC) कोण आहेत? NEET लीक प्रकरणात लातूरला मोठा धक्का, ‘आरसीसी कोचिंगचे’ शिवराज मोटेगावकरअटकेत
- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणअंतरवाली सराटी (जालना), १७ मे २०२६: मराठा आरक्षणाच्या लढ्यात आघाडीवर असलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला… Read more: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला कडक अल्टिमेटम: २९ मेपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण
- बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरूपुणे/नागपूर, १७ मे २०२६ (महाराष्ट्र व्हॉइस): भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) ने सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal)… Read more: बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे पश्चिम महाराष्ट्र-विदर्भात वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनची तयारी सुरू
- NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यातनवी दिल्ली/पुणे, १७ मे २०२६: देशभरातील MBBS, BDS सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या NEET-UG २०२६ परीक्षेत मोठ्या… Read more: NEET- UG 2026 Paper Leak प्रकरण | NTA प्रणालीतील विश्वासघात, प्राध्यापकांचा रॅकेट आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
