MHT-CET Engineering, Pharmacy सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू. या तारखेपर्यंत Online Registration करता येईल.
बारावीनंतर अभियांत्रिकी (Engineering), औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) आणि बी. एस्सी (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा (MHT-CET) घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी (Online Registration) करता येईल.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भात सविस्तर सूचनापत्र जारी केले आहे. कोरोना महामारीमुळे बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये पुढील प्रक्रियेबाबत अस्वस्थता वाढली होती. प्रवेशप्रक्रिया कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सीईटी सेलने मंगळवारी (ता. ८) रात्री उशिरा सूचनापत्र जारी करत महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली आहे. पात्रतेच्या अटी- शर्तींसह सविस्तर सूचनापत्र संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विलंब शुल्कासह १५ जुलैपर्यंत मुदत
सीईटी सेलतर्फे सध्यातरी केवळ नोंदणी प्रक्रियेबाबतच्या तारखांची घोषणा केली आहे. परीक्षेच्या तारखेची घोषणा अद्याप झालेली नाही. दरम्यान, नियमित शुल्कासह ऑनलाइन नोंदणीची मुदत ७ जुलैपर्यंत आहे, तर ८ ते १५ जुलैदरम्यान पाचशे रुपये विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.
बारावीच्या अभ्यासक्रमावर भर
सीईटी परीक्षा संगणकावर आधारित (कॉप्युटर बेस्ड टेस्ट) असेल, तसेच चुकीच्या उत्तरासाठी गुण कपात (निगेटिव्ह मार्किंग) लागू नसेल. परीक्षेत राज्य स्तरावरील शिक्षण मंडळाच्या शिक्षणक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. यात २० टक्के प्रश्न अकरावी, तर उर्वरित ८० टक्के प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. परीक्षेत तीन पेपर असतील. पहिला पेपर गणित (मॅथेमॅटिक्स) विषयाचा असेल. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे परीक्षेत ५० प्रश्नांसाठी १०० गुण असतील. पेपर दोनमध्ये भौतिकशास्त्र (फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या विषयांचे प्रत्येकी ५० असे एकूण १०० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला एक याप्रमाणे शंभर गुणांसाठी हा पेपर असेल. तर पेपर क्रमांक तीन जीवशास्त्र (बायोलॉजी) विषयावर आधारित असेल. यात प्रत्येकी एक गुणासाठी असे शंभर प्रश्न विचारले जातील. तिन्ही पेपरांसाठी प्रत्येकी नव्वद मिनिटे वेळ असेल.
निकाल पर्सेंटाईल पद्धतीनेच
दोन वर्षांपूर्वी निकाल जाहीर करण्याच्या पद्धतीवरून गोंधळ झाला होता. यानंतर नियोजनात गतवर्षी सुधारणा केल्या होत्या. त्यानुसार यंदाही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपची स्वतंत्र परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना दोन्ही ग्रुपसाठी प्रविष्ट होता येईल. मात्र, परीक्षा केंद्र वेगवेगळे असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर होणार आहे.
-: हे ही वाचा :-
- धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा : विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षण मंत्र्यांनी घेतली नैतिक जबाबदारी; प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभारनवी दिल्ली, २६ जुलै : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET-UG) पेपर लीक प्रकरण आणि परीक्षा पद्धतीतील अनियमिततेमुळे देशभरात उफाळलेल्या विद्यार्थी असंतोषाच्या
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीनवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील
- महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून हंगामात महाराष्ट्रात कमालीची टोकाची
- बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण घेतले आहे. या
- अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळछत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६

