नांदेड आयटीआयमध्ये 4 हजार 156 जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ; ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 23 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये सन 2021-22 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय आयटीआयत 2 हजार 616 तर खाजगी आयटीआयत 1 हजार 540 जागा अशा एकूण 4 हजार 156 जागेसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतीनी या संधीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार यांनी केले आहे. इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत आयटीआयच्या विविध ट्रेडला मागणी अधिक आहे. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application
जिल्ह्यातील प्रवेशासाठी विविध तालुकास्तरावर असलेल्या संस्थेत विविध ट्रेडसाठी जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येतो. इयत्ता दहावी उत्तीर्ण, अनुर्तीण विद्यार्थी मोठया प्रमाणात आयटीआयमध्ये प्रवेश घेतात. राज्यातील शासकीय व खाजगी आयटीआयत प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. गेल्या काही वर्षापासून आयटीआयच्या प्रवेशासाठी विद्यार्थी पुढे येत आहेत. गेल्या वर्षी राज्यात उपलब्ध जागेच्या तिपटीहून अधिक अर्ज आले होते. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application
यावर्षी हा आकडा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील आयटीआमधील ट्रेडमध्ये बेसिक कॉस्मेटोलॉजी, सुतारकाम, स्युईंग टेक्नोलॉजी, ड्राफ्टसमन सिव्हील, ड्राफ्टसमन मेकॅनिक, फिटर, फॉन्ड्रीमैन, आयसीटीएसएम, मशीनीस्ट, मशीनीस्ट ग्राईंडर, मेसन मेकॅनिक मोटार व्हीकल, फॅशन टेक्नोलॉजी, मेकॅनिक ट्रॅक्टर, पेंटर जनरल, शीट मेटल वर्कर, टुल अँड डायमेकर, टर्नर, वेल्डर, तारतंत्री, यांत्रिकी डिझेल, आरेखक यांत्रिकी इत्यादीचा समावेश आहे. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application
जिल्ह्यात शासकीय आयटीआय संस्थेची प्रवेश क्षमता पुढीलप्रमाणे आहे. नांदेड- 820, धर्माबाद- 232, किनवट- 128, हदगाव- 228, भोकर- 84, देगलूर- 164, कंधार- 92, लोहा- 104, उमरी- 188, मुखेड- 84, बिलोली- 88, माहूर- 104, अर्धापूर- 64, नायगाव- 40, मुदखेड- 152, हिमायतनगर- 24, पाटोदा- 20 असे एकूण 2 हजार 616 जागा उपलब्ध आहेत. तर जिल्ह्यातील खाजगी आयटीआयत हुजूर साहेब नांदेड- 240, नॅशनल नांदेड- 124, ग्रामीण नेहरुनगर नागलगाव कंधार- 456, माळाकोळी लोहा- 272, विष्णुपुरी नांदेड- 252, कलावतीबाई चव्हाण नायगाव- 88, ग्रामीण कंधार- 108 अशा एकुण 1 हजार 540 जागा उपलब्ध आहेत. Admission process started for 4 thousand 156 seats in Nanded ITI; Appeal to register online application
हे ही वाचा ——————————–
- खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री : कुणाल चांदगुडे यांच्या आई संगीता चांदगुडे होत्या युट्युबर; कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरल
New Twist in Khavdya Dongar Tragedy: Kunal Chandgude’s Mother Was a YouTuber; Family Dispute - छत्रपती संभाजीनगर : खवड्या डोंगरावर कुटुंबाची दुर्दैवी घटना, रागात आणि कौटुंबिक वादात संपूर्ण कुटुंबाचा अंत
Heartbreaking Tragedy at Khavdya Dongar: Son Jumps, Parents Die Trying to Save Him छत्रपती - नरेंद्र मोदी यांनी वापरलेला ‘नक्षली दिमाग’ वक्तव्यावरून देशात नवा वाद: राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि लोकशाहीवरील परिणामांचा आढावा
M Modi’s ‘Naxali Dimag’ Remark Sparks Debate: A Look at Political Fallout & National

