Tokyo Olympic 8 Players Participate From Maharashtra State | टोकियो अॉलम्पिक महाराष्ट्रातुन आठ खेळाडूचा सहभाग
टोकियो दि. 24 : जगातील मानाची स्पर्धा समजली जाणाऱ्या टोकियो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहचली. 24 ते 8 ऑगस्ट या कालावधीत जपानमधील टोकियो शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी 18 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातून 126 खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करताना पाहायला मिळणार आहेत. यात महाराष्ट्रातील आठ खेळाडूंचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राज्यातील खेळाडूंमध्ये 6 खेळाडू 23 ते 8 ऑगस्ट दरम्यान मैदानात उतरतील. तर उर्वरित 2 खेळाडू पॅरा ऑलिम्पिकमध्ये देशासाठी प्रतिनिधीत्व करणार आहेत. जाणून घेऊयात जागतिक स्तरावरील सर्वोच्च स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंसदर्भातील खास माहिती (This 8 Players From Maharashtra State will Participate in Tokyo Olympic)
टोकियो ऑलिंपिकमध्ये 126 खेळाडूंचा भारतीय संघ अठरा क्रीडाप्रकारात देशाला पदक जिंकून देण्यासाठी खेळणार आहे. आपल्या महाराष्ट्रातून 1) राही सरनोबत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-25 मीटर पिस्तूल), 2) तेजस्वीनी सावंत, कोल्हापूर (खेळ-शुटींग-50 मीटर). 3) अविनाश साबळ, बीड (खेळ-अॅथलेटिक्स 3000 मीटर स्टिपलचेस). 4) प्रविण जाधव, सातारा (खेळ-आर्चरी), 5) चिराग शेट्टी, मुंबई (खेळ-बॅडमिंटन पुरुष दुहेरी), 6) विष्णू सरवानन, मुंबई (खेळ-सेलिंग), 7) स्वरुप उन्हाळकर, कोल्हापूर (खेळ-पॅरा शुटिंग-10 मीटर रायफल), 8) सुयश जाधव, सोलापूर, (खेळ-पॅरा स्विमर-50 मीटर बटर फ्लाय, 200 मीटर वैयक्तिक मिडले)
हे आठ खेळाडू देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील. आपल्या उत्तम कामगिरीनं, खिलाडूवृत्तीनं राज्याचा, देशाचा गौरव वाढवतील, असा विश्वास आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या टोकीयो ऑलिंपिकमध्ये सहभागी खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो. ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत भारतीय संघातील खेळाडूंना, क्रीडा कार्यकर्त्यांना, क्रीडा रसिकांना टोकियो ऑलिंपिक स्पर्धेच्या मन:पूर्वक शुभेच्छा…
हे ही वाचा ———–
- Ahmedabad Plane Crash | गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, मोठी जीवित हानी ची शक्यताअहमदाबाद, १२ जून २०२५: गुजरातमधील अहमदाबाद येथे आज दुपारी एक मोठा विमान अपघात घडला
- PM Kisan Samman Nidhi Yojana 20th Installment |प्रधानमंत्री किसान सन्मान निधि 20व्या हप्त्याची संभाव्य तारीखप्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी
- Monsoon Update| महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजपुणे, १२ जून २०२५: भारतीय हवामान विभाग (IMD) आणि पुणे वेधशाळेच्या ताज्या अंदाजानुसार, आज
- बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आमरण उपोषणस्थळी मनोज जरांगे यांची भेटअमरावती, 11 जून 2025: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बच्चू कडू
- मद्यप्रेमींना मोठा झटका! महाराष्ट्रात दारू महागली, दरात ९ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढमुंबई, ११ जून २०२५: महाराष्ट्र सरकारने दारूवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) वाढवल्याने राज्यात दारूच्या