कुटुंबासाठी लाईफ इन्शुरन्स काढताय? या टिप्स वाचा!

कुटुंबासाठी लाईफ इन्शुरन्स काढताय? या टिप्स वाचा!

कोरोनाकाळात अनेकांनी घरातील कर्त्या व्यक्तीला गमावलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आहे. देव न करो आपल्यावर कधी अशी परिस्थिती आली, तर आपल्यामागे आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षीत ठेवता आलं पाहिजे. म्हणूनच आपल्या कुटुंबासाठी लाईफ इन्शुरन्स काढणं हा एक उत्तम मार्ग आहे. पण अनेकांना लाईफ इन्शुरन्स विषयी माहिती नसते. म्हणूनच आजच्या लेखात लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय आणि ते काढण्यासाठीच्या काही टिप्स जाणून घेऊया.


लाईफ इन्शुरन्स म्हणजे नक्की काय?


लाईफ इन्शुरन्स म्हणजेच “जीवन विमा” हा घरातील कमावता व्यक्ती भविष्यात आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या पाठबळ देण्यासाठी, सुरक्षीत ठेवण्यासाठी काढतो. विमा काढणारा व्यक्ती आणि जीवन विमा काढून देणाऱ्या विमा कंपनीचा व्यक्ती या दोघांमधील हा एक करार असतो. ज्यामध्ये संबंधीत इन्शुरन्स कंपनी विमा धारकाकडून मासिक शुल्क घेऊन आर्थिक सुरक्षिततेचा दावा करते. विमा काढून देणारा व्यक्ती करारानुसार आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षितता देतो.

Taking a life insurance for a family? Read these tips!


कोणत्या कंपनी लाईफ इंन्शुरन्स काढण्यासाठी फायदेशीर आहेत –
● एल आय सी – लाईफ इन्शुरन्स कॉर्पोशन ऑफ इंडिया. https://licindia.in/
● एस बी आय लाईफ इन्शुरन्स. https://www.sbilife.co.in/
● रिलायन्स निपुण लाईफ इन्शुरन्स https://www.reliancenipponlife.com/
● मॅक्स लाईफ इन्शुरन्स https://www.maxlifeinsurance.com/
● एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स https://www.hdfclife.com/
● पॉलिसी बाजार लाईफ इन्शुरन्स https://www.policybazaar.com/life-insurance/
या लिंकवर लाईफ इन्शुरन्सबाबत सर्व माहिती तुम्ही घेऊ शकता.


विमा काढण्याआधी आपल्याला त्याचा थोडा अभ्यास नक्कीच करावा लागतो. लाईफ इन्शुरन्समध्ये विविध प्रकार आहेत त्यातील आपल्यासाठी कोणता योग्य त्याप्रमाणे आपण जीवन विमा निवडावा लागतो. म्हणून लाईफ इन्शुरन्सचे काही प्रकार पाहुयात.


टर्म लाईफ इन्शुरन्स –


टर्म लाईफ इंशोरेन्स हा सर्वांना फायद्याचा ठरतो. यात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सेव्हिंगशिवाय, काही फायद्याच्या तत्वांसह, लाईफ इन्शुरन्सचं कवर म्हणजे सुरक्षा कवच प्रदान केलं जातं. त्यामुळे अनेक जण लाईफ इन्शुरन्सचा हा प्रकार निवडतात. इतर लाईफ इन्शुरन्सच्या तुलनेत टर्म इन्शुरन्सचे प्रीमियम अगदी कमी किंमतीतही असतात. शिवाय आपल्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम एकदाच न घेता आपल्या कुटुंबियांना महिन्यानुसार घेता येते.


यूएलआईपी –


यूएलआईपी म्हणजेच युनिट लिंक्ड इंशोरेन्स. या विमा प्रकारात अत्यंत जोखीम असते. आपण भरलेल्या रकमेतील काही भाग हा आपण करारात दिलेल्या मान्यतेनुसार इन्शुरन्स कंपनी इक्विटी शेअर मार्केटमध्ये गुंतवते. हा भाग वाढवून मिळण्याचा दावा केला जातो मात्र त्याची खात्री आपल्याला दिली जात नाही त्यामुळे शक्यतो असे लाईफ इन्शुरन्स हे मोठमोठे व्यावसायिक काढणं पसंत करतात. सर्वसामान्य व्यक्तीसाठी हा विमा प्रकार सुरक्षीत ठरत नाही.


एंडोमेंट प्लॅन –


लाईफ इन्शुरन्सचा हा असा प्रकार आहे ज्यात आपल्याला काढलेल्या विमेतून सुरक्षा कवच आणि सोबतच एक बचतीचा पर्याय दिला जातो. यात आपल्याला कराराच्या अवधीनूसार बचत करता येते. ती अवधी संपुष्टात आली आणि आपणही त्या वेळेस सुरक्षीत असू तर आपण भरलेली रक्कम आपल्याला काही फायद्यांसह मिळते.


होल लाईफ इन्शुरन्स-


होल लाईफ इन्शुरन्समध्ये व्यक्तीच्या संपूर्ण जीवनापर्यंत हा विमा असतो. याला कोणत्याही प्रकारची अवधी नसते. व्यक्तीच्या साधारण १०० वर्ष जीवन कालावधीपर्यंत इन्शुरन्स कंपनी सुरक्षा कवच प्रदान करते. हा विमा खरेदी करताना एका नॉमिनीचं नाव आपल्याला सुचवणे महत्त्वाचं असतं. कारण आपल्या मृत्यूनंतर नॉमिनीला डेथ क्लेम आणि बोनस लागू होतो.


चाइल्ड प्लॅन –


लाईफ इन्शुरन्स मधील चाईल्ड प्लॅन हा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी असतो. हा विमा आपल्या मुलांचं शिक्षण आणि लग्न आपल्यानंतर कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय पार पडावं म्हणून काढला जातो. आपल्या मृत्यूनंतर मुलांना वार्षिक स्वरुपात रक्कम दिली जाते. सोबतच विमाच्या अवधी आधी आपला मृत्यू झाला असेल, तर पुढील हफ्ते आपल्याला माफ होतात ते आपल्या मुलांना भरावे लागत नाही. त्यामुळे लाईफ इन्शुरन्सचा हा प्रकार मुलांच्या दृष्टीने सोईस्कर ठरतो.


लाईफ इन्शुरन्स काढून आपल्याला काय फायदा होतो?


●लाईफ इशोरेन्स काढण्याचा पहिला फायदा हा होतो की, आपल्याला कुटुंबाच्या भविष्याविषयी चिंता लागून राहत नाही.
●आपण सुरक्षित असू तर भरलेले पैसे विम्याच्या अवधीनंतर आपल्याला व्याजासकट पुन्हा मिळतात त्यामुळे एका अर्थी आपली चांगली बचतही होते.
● जर यूएलआईपी सारखा विम्याचा प्रकार आपण निवडला असेल, तर आपण भरलेल्या रकमेवर अधिकची रक्कमही मिळते.
● आपल्या विम्याचे हफ्ते आपण एकत्रितरित्या भरू शकतो किंवा एक, तीन, सहा महिन्यातून एकदा ही एकत्रित भरु शकतो.
लाईफ इन्शुरन्स काढताना काय काळजी घ्याल?
इन्शुरन्सच्या नावावर अनेक जण आपल्याला फसवू शकतात. त्यामुळे वरील पैकी कोणत्या प्रकारातला इन्शुरन्स आपल्या नावे काढला जात आहे, याची आपल्याला पूर्ण खात्री करायला हवी.
●इन्शुरन्स काढताना कागदपत्रांची जबाबदारी इन्शुरन्स काढून देणाऱ्या व्यक्तीवर सोपवू नका. आपल्याला कळत नसेल तर घरातील काही जाणकारांची मदत घ्या.
●अनेक जण आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेची काळजी करत मोठ्या रकमेचे विमे काढतात. मात्र नंतर त्याचे हफ्ते भरणं त्यांना कठीण होतं. म्हणून आपल्याला झेपेल असा विमा निवडा. आपले इतर खर्च भागून विम्याची रक्कम भरता येत आहे ना हे पहा.
●ज्या व्यक्तीला नॉमिनी ठेवलं आहे ती व्यक्ती घरातली असू द्या. जिच्यावर आपला अधिक विश्वास आहे त्या व्यक्तीला नॉमिनी ठेवा.
● कंपनीची खात्री करण्यासाठी इंटरनेटवर संबंधीत कंपनीचं नाव टाकून त्या कंपनीच्या वेबसाईटवर त्या कंपनीचा क्लेम रेशो तपासा. तो जर ९५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या कंपनीला प्राधान्य द्या. इतर माहितीही तपासा.
तर या आहेत काही टिप्स ज्या आपल्याला आपल्या कुटुंबासाठी लाईफ इन्शुरन्स काढण्यास उपयोगी ठरू शकतात. तुम्हाला हा लेख कसा वाटला, हे नक्की सांगा आणि आपल्या मित्र परिवारातही हा लेख पाठवायला विसरु नका.

https://www.youtube.com/watch?v=19nPR3sOZ-c

हे ही वाचा ——-

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice