राज्यपाल भगत सिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य “राजस्थानी – गुजराथी समाजांमुळेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी”

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्य “राजस्थानी – गुजराथी समाजांमुळेच  मुंबई देशाची आर्थिक राजधानी”

Governor Bhagat Singh Koshyari’s controversial statement “Mumbai is the financial capital of the country only because of the Rajasthani-Gujarati communities”

मुंबई दि. 29 : मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. Governor Bhagat Singh Koshyari’s controversial statement “Mumbai is the financial capital of the country only because of the Rajasthani-Gujarati communities”

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लव्हेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली.  राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.

भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे  असे राज्यपालांनी सांगितले. Governor Bhagat Singh Koshyari’s controversial statement “Mumbai is the financial capital of the country only because of the Rajasthani-Gujarati communities”

<

Related posts

Leave a Comment