तिसरी लाट सुरु झालीये, कोरोना निर्बंधाबाबत नागरिकांनी सहकार्य करावं- आरोग्यमंत्री राजेश टोपे

तिसरी लाट सुरु झालीये, कोरोना निर्बंधाबाबत नागरिकांनी सहकार्य करावं- आरोग्यमंत्री राजेश टोपे

The third wave has started, citizens should cooperate regarding corona restriction – Health Minister Rajesh Tope

मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राकडून आलेल्या सूचनांबाबत माहिती देण्यात आली आहे. जास्त रुग्णांना लक्षण नाहीत, लक्षणं असणाऱ्य रुग्णांची संख्या कमी आहे. होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन हेल्थ कीट देणार आहेत, त्यात सॅनिटायझर, 10 मास्क, माहिती पुस्तिका, 10 पॅरासिमॉल टॅबलेट, 20 मल्टी व्हिटॅमिनच्या टॅबलेट असणार आहेत.

तशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच क्वारंटाईन काळ हा सर्व राज्यात सात दिवसांचाच राहणार आहे. अशी माहिती टोपेंनी दिली आहे. कॉल सेंटरवरून रुग्णाला कॉल जाणार असल्याचीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कॉल सेंटरवरून ही प्रक्रिया पार पडणार आहे.

रुग्णांची विचारपूस कॉलद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णाला अडचण आल्यास त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावं यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, तसेच डॅशबोर्ड तयार करून रुग्णांना सर्व माहिती व्यवस्थित मिळावी याची खबरदारी घेतली जाणार, यात रुग्णांना बेड आणि औषधांबाबत माहिती मिळणार आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. क्वॉरंटाईन कालावधी किती दिवसांचा असावा इथपासून ते लॉकडाऊन लावावा की लावू नये आदींबाबत आज मोठे निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

=================

<

Related posts

Leave a Comment