उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Five state assembly elections announced

मुख्य निवडणूक आयुक्त आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करतील. त्यात उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभांचा समावेश आहे. ह्या पाच राज्यांकडे मिनि लोकसभा म्हणूनही पाहिलं जातंय. त्यामुळे देश महाराष्ट्राचं ह्या निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे. Uttar Pradesh, Goa, Punjab, Uttarakhand and Manipur state assembly election programs announced

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातल्या पाच राज्यांसाठी निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीय. यात सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा समावेश आहे. तसच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मनिपूर ह्या इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रकही जाहीर केलं. नव्या वर्षात ह्या पाचही राज्यात नवं सरकार असेल. उत्तर प्रदेशच्या निवडणूक वेळापत्रकाकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचही लक्ष आहे. कारण लोकसभेच्या यशाचा मार्गही याच राज्यातून जातो.

किती टप्प्यात निवडणूक असणार? मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा

पाचही राज्यात 7 टप्यात मतदान
गोवा, उत्तराखंड, पंजाबमध्ये एकाच टप्यात मतदान
मणिपूरमध्ये दोन टप्यात मतदान
पाचही राज्यांची मतमोजणी 10 मार्चला.
गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान 10 मार्चला मतमोजणी
मणिपूरमध्ये पहिला टप्पा 27 फेब्रुवारी दुसरा 3 मार्चला
10 फेब्रुवारीला यूपीत मतदानाचा पहिला टप्पा
यूपीत एकूण 7 टप्यात मतदान होणार
14 फेब्रुवारीलाच पंजाब, उत्तराखंडमध्येही एकाच दिवशी मतदान

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब, मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात 7टप्प्यात निवडणूक घेतली जाईल. तर, पंजाबमध्ये 3 टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. मणिपूरमध्ये 2 टप्प्यात निवडणूक घेतली जाईल. तर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात निवडणूक घेतली जाईल Uttar Pradesh, Goa, Punjab, Uttarakhand and Manipur state assembly election programs announced

==============

<

Related posts

Leave a Comment