एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निघणार तोडगा,शरद पवारचा पुढाकार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निघणार तोडगा,शरद पवारचा पुढाकार

Settlement on ST workers’ strike, Sharad Pawar’s initiative

मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय. तसंच कर्मचाऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं पवार म्हणाले आहेत.

परिवहन मंत्री अनिल परब आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि आजच्या चर्चेबाबत महिती दिली. अनिल परब म्हणाले की, राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ द्यावी, या मागणीचा विचार एसटी सुरू झाल्यानंतर करण्यात येईल, याबाबत शासन सकारात्मक विचार करेल.

कारण जी पगारवाढ दिली आहे, ते दोन करार आणि फरक यांचा विचार करून शासन निर्णय घेईल यावर आज चर्चा झाली. तसेच जे कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

===================

<

Related posts

Leave a Comment