पुढील तीन दिवस याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

पुढील तीन दिवस याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

Chance of unseasonal rain here for the next three days; Punjabrao Dakh’s new weather forecast

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज असा आहे कि 20-21 मार्चला राज्यामध्ये मुंबई, जुन्नर, नगर जिल्हा तसेच नाशिकच्या थोड्याफार भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुरळ ठिकाणी म्हणजेच नगर जिल्ह्यातील एक-दोन खेड्यामध्ये पाऊस पडण्याची थोडी शक्यता आहे. 21 मार्च चा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच्या आहे.

त्याच्यानंतर राज्यात एकंदरीत परिस्थिती अशी असणार आहे कि 24 आणि 25 तारखेला पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. 24 आणि 25 तारखेला पूर्व विदर्भामध्ये खूप आभाळ येणार आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी खराब वातावरणामुळे गेल्या दहा दिवसाखाली त्यांचा हरभरा आणि गहू काढून घेतला पण त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी उशिरा पेरणी केली त्यांचा हरभरा आणि गहू आता राहिलेला आहे.

सर्व शेतकऱ्यांनी 5 एप्रिलच्या अगोदर म्हणजे आणखी पंधरा दिवसांनी म्हणजे 5 एप्रिलच्या अगोदर तुम्ही सर्व तुमच्या शेतातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच शेतातील कोणतेही पीक असेल ते काढून घ्या‌ कारण की पाच एप्रिल नंतर राज्यामध्ये परत वातावरण खराब होणार आहे. या हवामान अंदाजाकडे पुन्हा लक्ष द्यायचं आणि आपण आपल्या पिकाचे संरक्षण करायचं. Chance of unseasonal rain here for the next three days; Punjabrao Dakh’s new weather forecast

source : पंजाबराव डख हवामान अंदाज 

<

Related posts

Leave a Comment