महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात,ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यात आणि कोणतीही सामाजीक,राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या,सर्वसामान्य कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी नाथरा या छोट्याशा गावी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म (Gopinathravji Munde Saheb was born on December 12, 1949 in a small village called Nathra) झाला. स्वबळावर, स्वकर्तृत्वाने त्यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ऊसतोड कामगारांचा नेता, मुकादमांचा नेता,सहकार सम्राट, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार, लोकसभा उपनेते ते केंद्रीय मंत्री अशी फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी घेतली.गगनभरारी घेतली तरी आपल्या मातीशी असलेली आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.आपल्या मातीशी,आपल्या सर्वसामान्य जनतेशी आपुलकी,निष्ठा जपणारे मुंडे साहेब हे आजच्या सुशिक्षित तरुणांसाठी एक प्रेरणादायी ऊर्जास्त्रोत आहेत. (June 3, 2014 was Gopinath Munde (Punyatithi) death anniversary) Struggle Warrior – Gopinathravji Munde “Even though I am not with you, my legacy of struggle is with you.”
“ज्या वर्गात आपण जन्माला आलो,ज्या वर्गाचे दु:ख भोगले,ज्या समस्या मला राजकारणात वाटतात,त्यासाठी जगावेसे वाटते.” त्याचबरोबर ” मी जगलो ते मागासलेल्या दुबळ्या जनतेसाठी,ज्यांचा कोणी वाली नाही,ज्यांची कोणी वाणी नाही.”साहेबांच्या जीवन प्रवासातील हे बोल ऐकताच तळा-गाळातल्या अतिशय सर्वसामान्य व्यक्तीलाही हा लोकनेता, आपल्या अत्यंत जवळचा असणारा,आपल्याला येणा-या समस्यांची जाण असलेला,आपल्या जीवनाला दिशा देणारा,आपल्या प्रश्नांना वाचा फोडणारा ‘आधारवड’च वाटतो व आजही या लोकनेत्याच्या आठवणींनी डोळ्यांच्या कडा पाणवल्याशिवाय राहत नाही.नेता कसा असावा? याचे आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब ! (Struggle Warrior – Gopinathravji Munde “Even though I am not with you, my legacy of struggle is with you.”)
गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जीवनप्रवास म्हणजे स्वातंत्र्यानंतरही सामाजीक व राजकीय प्रवाहापासून वंचित राहिलेल्या समाजाला प्रवाहात आणणा-या प्रेरणादायी विचारांचा,जीवनसंघर्षाचा प्रवास आहे!देशातील उपेक्षित,वंचित घटकांना सामाजीक व राजकीय प्रवाहात आणण्यासाठी साहेबांनी दिलेले योगदान हे महत्त्वपूर्ण आहे.’लोकनेता’ ही बिरूदावली साहेबांना काही योगा-योगाने मिळालेली नाही,तर सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी,न्यायासाठी सतत चार दशकं अविरत असणा-या संघर्षाचे तसेच सामाजीक,राजकीय,शिक्षण,कायदा व सुव्यवस्था,सहकार कृषी इ. क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचे ते फलित आहे. साहेबांचा जीवनातील संघर्ष म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास आहे. (Struggle Warrior – Gopinathravji Munde “Even though I am not with you, my legacy of struggle is with you.”)
त्यांच्या राजकीय कार्यकाळातील काही अल्पसा काळ सोडला तर जास्त काळ त्यांनी विरोधीपक्षाची भूमिका निभावली आहे.सत्ताधा-यांनाही हेवा वाटावा अशी ती भूमिका होती.आपल्या निडर,निर्भीड आणि बुलंद आवाजाने समग्र सभा किंवा सभागृह गाजवण्याची एक अनोखी ताकद त्यांच्या बुलंद आवाजात होती.आपल्या विनोदी शैलीने विरोधकांना खळखळून हसवत चिमटा काढणारे साहेब म्हणजे सामाजीक समरसतेचे अग्रणीच होते!साहेबांची सभा म्हणजे श्रोत्यांसाठी एक मेजवानीचं असायची.सभा असेल त्या ठिकाणी जाऊन, मिळेल त्या ठिकाणी बसून,कशा ही परिस्थितीत साहेबांच्या सभेला तरूणांपासून ते अबालवृध्दांपर्यंत गर्दी ही ओसांडून वाहायची. “मी पोहचत नसलो तरी,माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय.” या एका वाक्याने अखंड गर्दीचा अलोट असणा-या सभेत एक शांततेचे वातावरण निर्माण व्हायला काही क्षणांचा अवधी ही पुरेसा असायचा.
राजकीय सत्तेत फार कमी सत्ताधारी काळ त्यांना लाभला असला तरी लाखो जनतेच्या मनावर अविरत सत्ता गाजवली व आजही तितकीच ती सत्ता कायम आहे.साहेबांना भेटण्यास आलेली प्रत्येक व्यक्ती ही चेह-यावर हास्य फुलवत,समाधानाने घरी परतत असे.प्रत्येक व्यक्तीचे छोटे-असो कि मोठे काम, हे मार्गी लावण्यात ते एवढे मग्न असत,की साहेबांना वेळेची आठवण करून द्यावी लागायची.”माझ्या वेळेपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांची वेळ महत्त्वाची आहे.”असे ते आवर्जून सांगायचे.जनतेच कल्याण,जनतेविषयी आपुलकीची भावना जपणा-या साहेबांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी आजच्या चालणा-या चित्र-विचित्र राजकारणात नेहमीच प्रकर्षाने जाणवते.
ओबीसी समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी जो संघर्ष झाला.त्यात मुंडे साहेबांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे.आरक्षणाचा मुद्दा असो की विद्यापीठ नामांतर मुद्दा असो अशा कित्येक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच प्रागतिक बाजूने आपला कौल दिला आहे.” मी थकणार नाही,मी रूकणार नाही आणि कुणापुढे आयुष्यात कधी झुकणार नाही.”साहेबांचे हे उद्गार नेहमीच मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवल्याशिवाय राहत नाहीत.अगदी सर्वसामान्यातल्या-सर्वसामान्य माणसाला ही कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता,सत्तेच्या ताकदीपुढे न झुकता,आपला स्वाभिमानी बाणा कायम,ताठ ठेवत,साहेबांनी जगायला शिकवलं. (Struggle Warrior – Gopinathravji Munde “Even though I am not with you, my legacy of struggle is with you.”)
३ जून २०१४ हा काळा दिवस उगवला व याच दिवशी नियतीने तळा-गाळातील जनसामान्यांचा आधार असलेला हा लोकनेता, (June 3, 2014 was Gopinath Munde’s death anniversary )झुंजारनेता,संघर्षयोध्दा हिरावून घेतला.आजही सामाजीक असो कि राजकीय असो असा कोणताही प्रसंग नाही कि ज्यात साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.फुलांच्या सुगंधाप्रमाणे सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे मुंडे साहेब जरी आज आपल्यात नसले तरी वंचितासाठी,कष्टक-यांसाठी,कायम दरवळत राहण्याचा वारसा मागे ठेवून गेले आहेत.त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी जाणवते,तेव्हा ती पोकळी नाहीतर फुलांची पाकळी बनून जनसेवेने, जनतेचे जीवन सुगंधित करण्याची प्रेरणा देते व प्रेरणा देत राहिल. “साहेब तुमच्यात नसले तरी त्यांचा संघर्षाचा वारसा तुमच्या सोबत आहे.” साहेबांना पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन..!! Gopinath Munde (Punyatithi) death anniversary
संघर्ष सुर्याच्या पिल्लांना
अंधाराची नसे फिकीर
अंगार धमन्यातूनी वाहतो
संघर्षाचे आम्ही फकीर..!!
–कु.कल्पना कल्याण घुगे,जालना